तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 19 January 2020

पाच वर्षांच्या आश्रुबा फड या लहान वयाच्या मुलामध्ये ना. धनंजय मुंडे यांची क्रेद....!परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री ना.धनंजय मुंडे साहेबांनी आज दिनांक 18 जानेवारी 2020 रोजी श्री बालाजी स्टोन क्रेशर चे कार्यालय हनुमान चौक परळी वै येथे सदिच्छा भेट दिली तेंव्हा   5 वर्षाच्या अश्रुबा (आशु) सुरेश फड यांची गळा भेट घेत  कौतुक केले. धनंजय मुंडे यांची लहान वयातील पाच  वर्षाच्या मुलांमध्ये क्रेझ  असल्याचे यातून दिसून येत  आहे.
  परळी विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार धनंजय मुंडे हे निवडून यावेत म्हणून कन्हेरवाडी येथील सुरेश नाना फड यांचे चिंरजीव  आशू याने खाऊच्या पैश्यातून गल्यात बचत केलेल्या पैशातून श्री गणरायाच्या चरणी पाच किलो पेढे  अर्पण केले . एवढ्या लहान वयातच धनंजय मुंडे साहेब यांच्या प्रती  प्रेम व जिव्हाळा मोठ्यांचा किंवा ज्येष्ठांचाच  नसून पाच वर्षीच्या मुलंमध्ये क्रेझ असल्याचे दिसून येत आहे. लहान, थोरांमध्ये आपल्या लाडक्या नेत्याबद्दल प्रेम पाहवयास मिळत आहे. दरम्यान धनंजय मुंडे यांचे पुष्पगुच्छ गुच्छ पेढा भरवून फड परिवारा तर्फे स्वागत करण्यात आले. यावेळी वसंत बापू फड, निवृत्ती फड, बशीर चाचा, आय.ए.एस. किरणकुमार गित्ते ,    माणिकभाऊ फड,  बालासाहेब फड, सुरेश नाना फड    गोविंदराव फड ,संजय आघाव ,प्रदीपजी खाडे संजय कराड अंकुश फड  बाळू पाटील शेख लतीफ , व इतर मान्यवर मंडळी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment