तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 20 January 2020

लोकशाही मार्गाने येत्या आठ दिवसात नियमबाह्य राखेची वाहतूक बंद न झाल्यास ठोकशाहीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल-नंदकिशोर मुंडे


वैध राखच्या वाहतुकी संदर्भातील विविध मागण्यांचे तहसीलदार यांना निवेदन 

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  परळी शहर व तालुक्यातील परिसरातील व परळी-बीड हायवे या रस्त्यावर नियमबाह्य व अवैद्य रित्या राख वाहतुक बंद करणायासाठी परळीचे तहसीलदार यांना एक निवेदनाद्वारे मागणी केली आहे. निवेदन नायब तहसीलदार सदानंद बरदाळे यांनी स्विकारले. प्रशासनाच्या वतीने नियमबाह्य राखेच्या होणाऱ्या वाहतूकिला पायबंद करावा अन्यथा येत्या आठ दिवसांत आमच्या मागण्या मान्य न झाल्यास ठोकशाहीने रास्ता रोको आंदोलन करण्यात असा इशारा पांगरीचे नंदकिशोर मुंडे व इतर नागरिकांनी दिला आहे.

           याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,  परळी परिसरातील परळी शहर व परळी-बीड हायवे मौजे टोकवाड़ी,तळेगांव,पांगरी लिंबोटा,गाढे पिंपळगांव,सेलु, डाबी,नागापुर इत्यादी गांवातील नागरीकांचे आरोग्य अत्यंत धोक्यात आले आहे. डोळयाच्या, फुफूसाचे,नाकाचे असे विविध आजार होऊन त्यांच्या आरोग्याची या वाहतुक राखेमुळे राखरांगोळी होत आहे.  तरी आपण आमच्या खालील मुद्यावर राखेची वाहतुक करणारे टिप्पर,ट्रक यातुन वाहिली जाणारी राख किचींतही ओली
केलेली नसते उलट कोरडीच राख सर्रास रस्त्यावरून वाहिली जाते. परिणामी रस्त्यावर राखेचे थर साचले जातात., ज्या वाहनातुन राख वाहिली जाते त्या वाहनावर उच्च दर्जाची ताडपत्री किंवा झाकण व्यवस्थित रित्या झाकलेले नसतात., ज्या वाहनातुन राख वाहिली जाते त्या वाहनावरील वाहक हे सर्रास दारू पिलेले असतात व वाहनाचा वेग हा मर्यादे पेक्षा खुप जास्त असतो. परिणामी अपघात होण्याची शक्यता जास्त असते. राखेची वाहतुक दिवसा न करता रात्री १२ ते सकाळी ०६ पर्यंत करण्यात यावी.  प्रशासनाने या निवेदनाचे अत्यंत गांभीर्यपुर्वक दखल घेवुन संबंधीत राखेच्या वाहनावर कडक कायदेशीररित्या कार्यवाही करावी. अन्यथा येत्या ८ दिवसात जर आपण कुठलीच कार्यवाही केली नाही तर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल व त्यानंतर कुठल्याही हिंसक प्रकाराला प्रशासन जवाबदार राहील असा इशारा नंदकिशोर मुंडे, अविनाश मुंडे , गोविंद मुंडे,सुशेन मुंडे,रामधन मुंडे,मुंजा मुंडे,संपत मुंडे, महेश तिडके, सचिन तिडके,बाळू गित्ते, महेश नागरगोजे,किरण मुंडे, अर्जुन नागरगोजे, मुकेश नागरगोजे, पवन मुंडे, विठ्ठल मुंडे,मनोज मुंडे, नितिन मुंडे आदी नागरिकांच्या स्वाक्षर्या आहेत.  तहसीलदार यांच्या मार्फत .मा.ना.धनंजयजी मुंडे साहेब, सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री बीड, मा.मुख्य अभियंता साहेब, औ.वि.केंद्र परळी वैजनाथ, बीड जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी परळी वैजनाथ यांनी निवेदन दिले आहेत.

No comments:

Post a Comment