तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 15 January 2020

'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' या पुस्तकावर बंदी घालावीसंभाजी ब्रिगेड यांची मागणी


मंगरुळपीर-"आज के शिवाजी नरेंद्र मोदी" या वादग्रस्त पुस्तकाद्वारे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची तुलना करण्यात आल्याने उभ्या जगाचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाला आहे.यामूळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळलेली आहे.या तुलनेने समस्त बहूजन समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.
छत्रपती शिवाजी राजेंचे कार्य महान आहे म्हणून संपूर्ण जगाने त्यांच्या विचाराला स्वीकारले आहे.छत्रपती शिवाजी राजांच्या पायाखालच्या मातीचीही जगात कोणताही राजकीय नेता बरोबरी करू शकत.असे असताना भारतीय जनता पार्टीचे जय भगवान गोयल यांनी लिहिलेल्या "आज के शिवाजी नरेंद्र मोदी" या वादग्रस्त पुस्तकामूळे छत्रपती शिवजीराजांचा अपमान झालेला आहे.तरी या पुस्तकाच्या प्रकाशनावर बंदी घालून लेखक गोयल यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा जेणेकरून यानंतर शिवछत्रपतींबाबत वादग्रस्त भूमीका घेण्याची कुणाची हिंमत होणार नाही अशी मागणी सामाजिक संभाजी ब्रिगेड,सामाजिक कार्यकर्ते,शिवप्रेमी यांच्यावतीने करण्यात आली.यावेळी संभाजी ब्रिगेडचे सचिन मांढरे,फुलचंद भगत,प्रतिक धोवटे,निलेश येवले,प्रशांत पेंढारकर,अहूल रजाक,मो.हाजू,मो.नहीम,शिवा सुर्वे,हरी वाढणकर,सामाजिक कार्यकर्ते अर्जुन भिमराव सुर्वे उपस्थित होते.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.9763007835,8459273206

No comments:

Post a Comment