तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 11 January 2020

बीडच्या खा. डॉ. प्रीतम मुंडेंकडून अबुधाबीत पर्यावरण संसदेत भारताचे प्रतिनिधित्वबीड (प्रतिनिधी) :- विश्वामध्ये होत असलेल्या पर्यावरण बदलाच्या दुष्परिणामाला रोखण्यासाठी जागतिक पातळीवर पावले उचलली जात आहेत. पर्यावरण समतोल राखण्यासाठी विविध उपाय योजना केल्या जात आहेत. याचाच भाग म्हणून अबुधाबी येथे तीन दिवसीय जागतिक पर्यावरण संसद (climet parliment) सुरु आहे. यात बीडच्या भाजप खासदार डॉ. प्रीतम मुंडे भारताचे प्रतिनिधीत्व करत आहेत. 
या जागतिक परिषदेला जगभरातील पर्यावरण तज्ज्ञ, अभ्यासक, विविध देशांचे लोकप्रतिनिधींचा सहभाग आहे. भारतातून सहभागी झालेल्या निवडक खासदारांमध्ये डॉ. प्रितम मुंडे यांचा सहभाग आहे. शुक्रवार पासून सुरु झालेली ही पर्यावरण संसद रविवार पर्यंत चालणार आहे. परिषदेत उर्जा वायदा, ग्रीन ग्रीड, इलेक्‍ट्रीक पाककला, आणि जागतिक उर्जा संक्रमण किंवा अक्षय उर्जा आणि स्वच्छ पाककला या परिसंवादात डॉ. प्रीतम मुंडे यांनी सहभाग घेत आपले मत नोंदविले. 

No comments:

Post a comment