तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 11 January 2020

अवैधरित्या रेती वाहतूक करणा-या मॅटेडोअरने दिली आमदार डॉ संजय रायमुलकर यांच्या गाडीला धडकमेहकर : 11
अवैधरित्या रात्रीच्यावेळी रेतीची वाहतूक करणा-या टाटा ४०७ मॅटेडोअरने मेहकर तालुक्यातील उटी येथील धोटे बंधूना सात्वनपर भेट देऊन जानेफळ वरुण जात असतांना आमदार डॉ संजय रायमुलकर यांच्याईको स्पोर्ट गाडीला धडक दिल्याने आमदार डॉ संजय रायमुलकर चालक पंजाब गुडधे, अंगरक्षक पो कॉ निकम हे जखमी झाल्याची घटना १० जानेवारीला जानेफळ- मेहकर मार्गावरील नायगाव दत्तापुर नजीक असलेल्या घोणसर शिवारात घडली आहे.
सविस्तर वृत्त असे की मेहकर विधानसभा मतदारसंघाचे  आमदार डॉ संजय रायमुलकर हे उटी येथील धोटे बंधुना सात्वनपर भेट देण्यासाठी आले होते त्यांनी भेट देऊन अशोक धोटे यांच्या निवासस्थानी शुक्रवारी रात्री ८ वाजेदरम्यान भोजन घेतले व तद्नंतर उटीवरुन आपल्या ईको स्पोर्ट गाडीने मेहकरला रवाना झाले नायगाव दत्तापुर नजीक घोणसर शिवारात अवैध रित्या रेतीची विक्री करण्यासाठी नायगाव दत्तापुर येथे येत असलेल्या टाटा ४०७ एम एच २८ एच ९८०१ चा चालक मालक आरोपी  गणेश तुकाराम राऊत रा. माळीपेठ मेहकर वय २५ वर्षे याने आपले वाहन धरधाव वेगाने निष्काळजीपणे चालवून आमदार डॉ संजय रायमुलकर यांच्या ईको स्पोर्ट गाडी क्रमांक एम एच २८ ए झेड ७७७१ ला
जोरदार धडक दिली.
यामध्ये आमदार डॉ संजय रायमुलकर ईको स्पोर्टचे चालक पंजाब गुडधे अंगरक्षक पोकॉ निकम हे जखमी झाले. तात्काळ शिवाजी सखाराम चव्हाण या शेतकर्यांने आपल्या शेतातुन धावत येऊन मदत केली तद्नंतर नायगाव दत्तापुर येथील गावक-यांच्या मदतीने मेहकर येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले तद्नंतर त्यांना औरंगाबाद येथील खाजगी हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले घटनेची माहिती होताच  घटनास्थळावर जाऊन जानेफळ पोलिस स्टेशननचे ठाणेदार दिलीप मसराम दुय्यम ठाणेदार काकडे यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला व व रात्री उशिरा आरोपी चालकास ताब्यात घेऊन अटक केली या प्रकरणी जानेफळ पोलिस स्टेशनला शेतकरी शिवाजी सखाराम चव्हाण यांच्या फिर्यादीवरुन आरोपी चालक गणेश तुकाराम राऊत रा मेहकर याच्याविरुध्द अप नं ८\२० कलम २७९ ३३७,३३८,भादवी १३४, १८४ मोटरवाहन कायद्याप्रमाने गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास जानेफळ पोलिस करीत आहेत.
--------------------------------------
 विशेष म्हणजे आमदार डॉ संजय रायमुलकर यांच्या वाहणाला धडक देणा-या मेहकर येथील टाट ४०७ या वाहनाला दोन नंबर आहेत पुढील नंबरप्लेटवर एम एच २८ एच ९८०१ हा नंबर आहे तर मागील बाजुला एम एच २५ बी ६७१६ हा नंबर आहे त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.


 जमील पठाण
8805381333

No comments:

Post a Comment