तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 14 January 2020

वैद्यनाथ कॉलज मध्ये राष्ट्रीय युवा दिन साजरा


युवकांनी विवेकानंदाचे विचाराचे आत्मसाथ करावे- प्राचार्य डॉ . आर . के . इप्पर

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- वैद्यनाथ कॉलेज राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राष्ट्रीय युवा दिन,  राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली . यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ . आर . के . इप्पर तर प्रमुख उपस्थिती प्रा . डी . के . आंधळे, प्रा . डॉ . माधव रोडे उपस्थिती होते . राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सर्व उपस्थिती मान्यवर व एन . एस एस स्वंयसेवकांनी पुष्प वाहुन अभिवादन केले . याप्रसंगी मार्गदर्शन करताना प्राचार्य म्हणाले, आज आपल्या भारत देशातील वातावरण पाहता युवकांनी, विद्यार्थीनी राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक सलोखा जपावा, आपला देश अनेक जाती, पंथ, धर्म विविध परंपरेच्या समृह ने नटलेला हे मोठेपण आपल्या भारत राष्ट्रला लाभलेले आहे यासाठी स्वामी विवेकानंदना आपल राष्ट्र जगातील सर्व संप्रदायाचा एकोपा जपणारे प्रचंड उर्जाने भरलेले आहे . ती उर्जा युवकांमध्ये आहे तेव्हा आपण युवकांनी राष्ट्रीय एकात्मता टिकण्यासाठीचा दृष्टकोन विवेकानंदाच्या विचारातून आत्मसाथ करून सामाजिक बांधिलकी - बंधुत्व जपावे .यावेळी राष्ट्रमाता जिजाऊ याच्या विषयी बोलताना प्रा . डॉ . माधव रोडे म्हणाले, मानवी मुल्ये माणुसकीचे बाळ कडू छ्त्रपती शिवाजी महाराजा बाल वायात देऊन, मानवी भेदा पलीकडील रयत शिवबाची उभा करून माणुसकीचा अभेद किल्ला उभा केला . त्या राष्ट्रमाता जिजाऊची शिकवण आचारणात  अणावी मानवी मुल्ये जपावी असे आवाहन त्यांनी केले .
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाघेश्वर मोती यांनी केले ., कार्यक्रमास विवेक आघाव, सुनिल आसेवार, पौणिमा बारड, पांडूरंग गीते, ऋतिक रोडे, श्रध्दा स्वामी, गीताजंली दौंड, भरत बदने, चिखले, सपाटे, संकेत टाक, अनिकेत पवार, राजु जाधव, ऋतुजा गीते शिवम् कुसुमकर अदिनी सहकार्य केले

No comments:

Post a comment