तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 15 January 2020

५ वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन १७/१८ जानेवारीला व भव्य पुरस्कार सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे - कवी रंगनाथ मुंडेपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-
श्रीनाथा मानव सेवा मंडळ नाथा ता.परळी आयोजित पाच वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन व भव्य पुरस्कार सोहळा दि.१७/१८ जानेवारी २०२० रोजी श्री नाथा मानव सेवा मंडळ नाथा ता.परळी वैद्यनाथ.जि.बीडच्या वतीने ग्रामीण मराठी साहित्य संमेलन व विविध पुरस्कारांचा वितरण सोहळा १७/१८ जानेवारी रोजी तसेच पापनाथश्व माध्यमिक विद्यालय व इंदिरा बालसदन नाथाचे वार्षिक स्नेह संमेलन आयोजित केली आहे. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.तरी सर्व साहित्य रसिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी. श्री नाथा मानव सेवा मंडळाचे अध्यक्ष.मा.डॉ.एकनाथ मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या साहित्य संमेलनास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कवी रंगनाथ मुंडे यांनी केले आहे.

नाथ्रा येथे दि.17 व 18 जानेवारी 2020 रोजी
5 वे ग्रामिण मराठी साहित्य संम्मेलन व भव्य पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या संम्मेलनाचे उद्घाटन माजी कुलगुरु डॉ.जनार्धन वाघमारे यांच्या हस्ते होणार आहे. संम्मेनाच्या अध्यक्षस्थानी श्रीनाथ मानव सेवा मंडळाचे अध्यक्ष डॉ.एकनाथ घ. मुंडे हे आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणुन मराठी साहित्यीक सोपान हाळमकर, प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे, ज्येष्ठ साहित्यीक प्रा.अमर हबीब, प्रसिध्द कथाकार प्रा.भास्कर बडे, कवी प्रभाकर साळेगावकर, ज्येष्ठ साहित्यीक प्रा.मधु जामकर आदी उपस्थित राहणार आहेत.  संम्मेलनाची जय्यत तयारी सुरू आहे. स्वतः हा ग्रामीण भागातील मराठी माणसे कसे राहतात.या वरती कविता संग्रह.स्पंदन.स्वराज.समरस हे  काव्यसंग्रह डॉ.एकनाथ मुंडे यांनी लिहिले आहेत.आत्मचरित्र वानाचपानी.आरोग्य क्षेत्रामध्ये निरोगी लेखसंग्रह व माझे अण्णा असे विविध पुस्तके डॉ.मुंडे यांनी लिहिले आहेत व ग्रामीण भागातील कवींसाठी स्वताचे व्यासपीठ तयार करून देण्याचे काम डॉ.एकनाथ मुंडे यांनी केले आहे.व विविध क्षेत्रामध्ये उत्कृष्ट  काम करणाऱ्याना प्रोत्साहित करण्यासाठी पुरस्कार दिले जाणार आहेत. सन्मानचिन्ह मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असणार आहे. आरोग्यभूषण. समाजभूषण. कृषीभूषण. साहित्यभूषण. संस्कृतीभूषण.क्रीडाभूषण. कलाभूषण. राजकीयभूषण. धार्मिकभूषण. शैक्षणिकभूषण. पत्रकारभूषण. लेखनभूषण. कवीभूषण. संशोधन व इतर क्षेत्रात विविध स्तरावर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींची निवड करण्यात आली आहे.  या साहित्य संमलनास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कवी रंगनाथ मुंडे यांनी केले आहे

No comments:

Post a comment