तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 15 January 2020

नारायणखेड उपसा सिंचन योजनेचे पालकमंत्र्यांच्याहस्ते उद्घाटनबुलडाणा, दि.14 :
दे. राजातालुक्यातील खडकपूर्णा प्रकल्पातील डाव्या मुख्य कालव्यावरील नारायणखेड उपसा सिंचनयोजनेचे जलपूजन व उद्घाटन आज 14 जानेवारी 2020 रोजी पालकमंत्री डॉ. राजेंद्रशिंगणे यांच्याहस्ते करण्यात आले.  सुरूवातीलानारायणखेड येथील वितरण कुंडामध्ये जलपूजन करून उपसा सिंचन योजनेच्या फलकाचे फितकापून अनावरण करण्यात आले. त्यानंतर पंपहाऊस, गावातील नळयोजनेचे उद्घाटन करण्यातआले. यावेळी पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता नितीन सुपेकर, खडकपूर्णाप्रकल्पाचे कार्यकारी अभियंता महादेव कदम, उपअभियंता श्री. विश्वकर्मा, ॲड काझीआदींसह लोकप्रतिनिधी, पाटबंधारे विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.   सदर उपसा सिंचन योजनेकरीता 115 अश्वशक्तीचे दोनपंप आहेत. या योजनेमुळे नारायणखेड, सरंबा, दे.मही, धोत्रा नंदई या गावातील लाभधारकांना सिंचनाचा लाभ होणार आहे. या योजनेतंर्गत 1019 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येते. सदरसिंचन 7.70 किलोमीटर लांबीचा मुख्य कालवा व 9 लघु कालव्यांद्वारे होते.   याप्रसंगी नारायणखेड पाणी वापर संस्थेचे गजाननचेके, पंढरी गिते, शिवानंद मुंडे व अन्य लाभधारक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठीसहायक अभियंता योगेश कापडणीस, खडकपूर्णा प्रकल्पाचे जी. बी खोत, नितीन डोईफोडे,श्री. व्यवहारे, श्रीमती दिशा चिकटे, श्री. उईके, प्रकाश वीर, श्री. दोडके,श्री.बहुरे आदींसह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.  


जमील पठाण
8805381333

No comments:

Post a comment