तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 14 January 2020

नरेंद्र मोदींची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना; परळीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निदर्शने
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
        भाजपच्या जयभगवान गोयल याने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजां समवेत केली.छत्रपती शिवराय तमाम मराठीजणांचा स्वाभिमान, अभिमान आणि अस्मिता आहेत.खुद्द प्रधानमंत्री यांना तरी लेखकाची ही भूमिका पटणारी आहे का? त्वरित हे पुस्तक मागे घेवून लेखकावर कायदेशीर कार्यवाही केली पाहिजे या मागणीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आज उपविभागीय कार्यालय परळी वैजनाथ येथे निदर्शने करुन निवेदन देण्यात आले.
      यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात हे पुस्तक मागे घ्यावे तसेच जाहीर माफी मागावी अशी मागणी करण्यात आली. लेखकावर कायदेशीर कार्यवाही करावी अशी मागणी करीत जोरदार निषेध नोंदवत निदर्शने करण्यात आली. यावेळी जि. प. सदस्य  अजय मुंडे, डॉ. संतोष मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष  बाजीराव धर्माधिकारी, आयूब पठान,वैजनाथ सोळंके,तुळशीराम पवार,अनंत इंगळे,सय्यद सिराज,संतोष शिंदे, गोपाळ आंधळे,रवि मुळे,राजेंद्र सोनी,संजय फड, शंकर कापसे,राजकुमार डाके,महेबूब खुरेशी, जयदत्त नरवटे,अमर रोडे,बळीराम नागरगोजे,प्रणव परळीकर,स्वप्नील वेरुळे, ज्ञानेश्वर होळबे,अमर टाकळकर, पप्पु काळे, शंकर कोचे, अनिल कदम,महादेव साबळे, महेश साबळे, विजय पुजारी, अभिजीत धाकपडे,पिंटू दुंदुले,गिरीष भोसले,पप्पु ठोंबरे,उमेश सुरवसे,शोएब खान,रमेश मस्के, भागवत कसबे,मझास इनामदार,तक्की खान, विष्णु साखरे आदींसह  राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment