तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 16 January 2020

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना स्वावलंबी करण्यासाठी शासकीय योजनांच्या माध्यमातून प्रयत्न प्रभारी जिल्हाधिकारी अजित कुंभार


  

बीड, दि. १६ (. मा. का.) :- ल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुं

बांच्या अडीअडचणी
जाणून घेवून त्यांना स्वावलंबी करण्यासाठी शासकीय योजनांच्या माध्यमातून आवश्यक ती मदत
करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे प्रतिपादन प्रभारी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे
केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला ऋणमुल ट्रस्ट, मुंबई यांच्या
वतीने आर्थिक मदत वितरणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ट्रस्टचे सचिव धनंजय माळी, सदस्य सूर्यकांत
कुलकर्णी, प्रकल्प संचालक डी. ए. वानखेडे, जिल्हा कृषि विकास अधिकारी सुभाष साळवे यांची प्रमुख
उपस्थिती होती.
यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी अजित कुंभार म्हणाले, जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना
स्वतःच्या पायावर उभा करण्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यात येणार आहे. तसेच
या कुटुंबातील शिक्षण घेणाऱ्या मुलांना विविध माध्यमातून शैक्षणिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न
करण्यात येणार आहेत. तसेच महिलांनाही बचत गटाच्या माध्यमातून कुटुंबाची आर्थिक उन्नती
साधण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
धनंजय माळी यांनी म्हणाले, जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्तांच्या कुटुंबांचा विकास करण्यासाठी या
कुटुंबांचा सविस्तर स्वे करण्यात येणार असून त्या माध्यमातून त्या कुटुंबाच्या गरजा लक्षात घेवून त्याची
विविध माध्यमातून पूर्तता करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. तसेच कुटुंबाचा सर्वांगीण विकास
करण्यासाठी वेळोवेळी आढावा बैठक घेण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
मुंबई ऋणमुल ट्रस्टच्या वतीने जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या १० कुटुंबाना प्रत्येकी दोन
हजार रुपयांची मदत करण्यात आली. यावेळी जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे कुटुंबिय व त्यांचे
नातेवाईक उपस्थित होते.

No comments:

Post a comment