तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 20 January 2020

नेतृत्व घडवणारा, पत्रकार..! पालकमंत्री,व सामाजिक


    पालकमं न्यायमंत्री मा. धनंजय मुंडे यांनी पत्रका
र संघाच्या कार्यक्रमात, माझ्यातील नेतृत्व गुण घरच्यांच्या अगोदर मानूरकरांनी बातमीतून मांडले, असे जाहीर पणे सांगितले होते.तर माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी ही दहा वर्षापूर्वी पहील्यांदाच निवडून प्रचारात आले आणि स्टार प्रचारक म्हणून मानुरकरांनी बातमी छापली असे सांगितले होते. राजकीय वारसा असलेली ही दोन प्रातिनिधीक उदाहरणे झाली. पण मागच्या 25 वर्षात राजकीय, सामाजिक, सांस्कृतिकसह वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणार्‍या तरुणांना आमने-सामने मुलाखतीतून जनतेसमोर आणण्याचे आणि त्यांच्यात नेतृत्वाचा आत्मविश्‍वास निर्माण करण्याचे काम पत्रकार संतोष मानूरकर यांनी लेखनीतून केले. त्यामुळे विद्यमान राजकीय, सामाजिक पातळीवर जिल्ह्यात आणि बाहेर काम करणार्‍यांच्या नेतृत्व गुणांची मशागत मानूरकरांच्या लेखनीतून झाली. व्यक्तीमत्व उलगाडत संघर्षमय जीवन शब्दबध्द करण्यात त्यांची हातोटी. परिणामी सर्वच क्षेत्रातील दिग्गजांची त्यांच्याशी स्नेहची नाळ जुळली ती कायमची. पंचवीस वर्षाच्या तपश्‍चर्येत एका, एका मुलाखतीतून आणि बातमीतून त्यांनी माणसे जोडली, जपली त्यामुळे त्यांचा सर्वदूर मित्र परिवार निर्माण झाला. काम करणार्‍या व्यक्तीच्या चुकांवर बोट ठेवणे सोपे असते. नकारात्मक, टीकात्मक बातमीदारी तर सर्वत्रच आहे. मात्र लेखनी माणसे उभी करण्यासाठी प्रभावीपणे काम करू शकते याचा वस्तुपाठच त्यांनी निर्माण केला हे विशेष. समाजातील व्यवस्थेविरुध्द आवाज उठवण्याबरोबर वेगवेगळ्या पातळीवर चांगले काम करणार्‍या, तरुणांना लोकांसमोर आणण्याचे काम त्यांनी केले. जनता दरबार या सदरामधून तर अनेक वर्ष वेगवेगळ्या विषयावर त्यांनी जवळपास लाख भर लोकांच्या मुलाखती घेतल्या असतील. इतक्या संख्येने थेट लोकांना बोलतं करून मुलाखती घेणारा हा एकमेव पत्रकार असावा. अत्यंत मितभाषी, कमालीचा शांत स्वभाव, तितकाच वेळप्रसंगी आक्रमक आणि संवेदनशिल स्वभाव गुण. विषयाची मांडणी आणि उत्तम राजकीय जाण यामुळे दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्यासह अनेकांशी त्यांचे विश्‍वासु मैत्री चे संबंध निर्माण झाले. जिल्हा स्तरावरील वर्तमानपत्राच्या वाचकांची नाडी ओळखून वृत्तांकन करण्यात त्यांचा हातखंडा आहे. वृत्तपत्राच्या ध्येय धोरणानुसार जाहीर सभांचे वृत्तांकन करणे, राजकीय दिशा ओळखून विषय मांडण्यात ते वाकबगार. शैलीवरुनच त्यांची बातमी ओळखली जाते. प्रशासनात अधिकारी, कर्मचार्‍यांशी विश्‍वासाचे संबंध कसे निर्माण करावेत याचा ते वस्तुपाठ असल्याने राज्यभरातील वरिष्ठ अधिकार्‍यांशी त्यांचा थेट संबंध असल्याने बदलून गेलेले अधिकारी बीडला आले की आठवणीने मानूरकरांना बोलवतात. वीस वर्षापासून जिल्हा पत्रकार संघाचे मजबूत संघटन करतांना त्यांच्या कल्पनेतून, नियोजनातून स्व.स.मा.गर्गे राज्यस्तरीय पत्रकारीता पुरस्काराला महाराष्ट्रात प्रतिष्ठा मिळाली. मागील काही वर्षापासून मुलांवर मुल्य संस्कार करणार्‍या स्काऊट आणि गाईड या चळवळीत मानूरकर रमले आहेत. याही ठिकाणी आपल्या कल्पकतेने त्यांनी मानूरकर पॅटर्न निर्माण केल्याने ते थेट राज्य आयुक्तपदापर्यंत पोहंचले आहोत, हे सोपे नाही. पण त्यांनी लिलया केले. कोणतेही काम बातमीसारखे नेटके पणाने आणि पूर्ण करण्याचा त्यांचा स्वभाव गुण असल्याने त्यांनी जिल्ह्याच्या राजकीय, सामाजिक जडणघडणीत त्यांच्या सिध्दहस्त लेखनी योगदान देत आहे.ग्रामीण भागातुन आलेल्या अनेक तरुणांना पत्रकारीतेचे धडे त्यांनी दिले. झुंजार नेता हे पत्रकार घडवणारे पीठच असल्याने या ठिकाणी आलेल्या अनेकानां त्यांनी घडविले आहे. अशा नेतृत्व आणि पत्रकार घडविणार्‍या मित्राला (20 जानेवारी २०२०) जन्मदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
 - वसंत मुंडे
प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबई.
 अध्यक्ष,  विभागीय पत्रकार अधिस्वीकृती समिती, औरंगाबाद.(महाराष्ट्र शासन)

No comments:

Post a comment