तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 19 January 2020

विविध खाद्य पदार्थ तयार करुन जिल्हा परिषद माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी केली खरी कमाई
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः- येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध खाद्य पदार्थ तयार करुन शाळेतल्याच विद्यार्थी, शिक्षक व पालकांनी हे पदार्थ विकत घेतल्याने विद्यार्थ्यांनी शालेय जिवनातच खर्‍या कमाईचा आनंद घेतला. या उपक्रमांचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ साहित्यीक रानबा गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. भविष्यात या उपक्रमांतुन विद्यार्थी आपला स्वताचा व्यवसाय टाकुन आर्थिक उन्नती करु शकतात असे प्रतिपादन या प्रसंगी रानबा गायकवाड यांनी केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक जि.बी.शेख होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन कन्या शाळेचे मुख्याध्यापक शास्त्री कांबळे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सय्यद अखिल सर यांनी केले. शाळेतील खरी कमाई या उपक्रमां अंतर्गत शाळेतील विद्यार्थी आणि विद्यार्थींनी घरी तयार केलेले खाद्य पदार्थ यावेळी विक्रीसाठी ठेवले होते. भजे, समोसा, खिचडी, कांदा पोहे, पाणी पुरी, पुरीभाजी, गुलाब जामून, लिंबू शरबत, चिवडा, ईडली सांबर, मसाले दार चन्ने, वडापाव आदी चविष्ठ पदार्थ यावेळी ठेवण्यात आले होते.
पदार्थ शाळेतील विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षकांनी विकत घेऊन या पदार्थांचे चव चाखली. या उपक्रमांतुन विद्यार्थ्यांना खाद्य पदार्थ कसे तयार करायचे व ते विकल्यानंतर किती कमाई होते. याचा अनुभव आला. या कार्यक्रमास शाळेतील विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षीका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

No comments:

Post a Comment