तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 21 January 2020

जवाहर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनाचे उत्साहात उद्धाटन संपन्न
जिंतूर
         जवाहर विद्यालय जिंतूर येथे दरवर्षीप्रमाणे भव्य सांस्कृतिक महोत्सवाचे म्हणजेच वार्षिक स्नेहसंमेलनाचे उत्साहात व थाटात उद्घाटन करण्यात आले.
          या उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष म्हणून संस्थेचे सचिव तथा विद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी मा.श्री.के.डी.वटाणे साहेब,उद्घाटक म्हणून IPS अधिकारी मा.श्री.श्रवनदत्त साहेब सहाय्यक पोलीस अधीक्षक जिंतूर, तर प्रमुख पाहुणे म्हणून मा.डॉ.अभिजित चवंडके साहेब,मा.श्री.गोपाळ चिद्रवार, अशोकराव घोरबांड(PI),दलमीर खाँ पठाण,बांधकाम सभापती शामराव मते,प्राचार्य श्री.बळीराम वटाणे सर, संस्थेचे संचालक श्री.किशनराव वटाणे साहेब आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
        कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै.दादासाहेब वटाणे पाटील यांच्या प्रतिमपूजनाने झाली.
            त्यानंतर मान्यवरांचे स्वागत संगीत विभागाच्या वतीने करण्यात आले व मान्यवरांचा यथोचित सत्कार झाल्यावर प्राचार्य श्री.बळीराम वटाणे साहेबांनी प्रास्ताविक मांडले व नंतर प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराला सुरुवात झाली.
        यावर्षी प्राचार्य श्री.बळीराम वटाणे साहेब यांच्या संकल्पनेतून भारतातील विविध प्रादेशिक ठिकाणची संस्कृती विद्यार्थ्यांनी आपल्या नृत्य, एकांकिका व गीतांमधून सादर केली. उपस्थित मान्यवरांनी या सर्व कार्यक्रमाचे व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
          यावेळी अध्यक्षीय भाषणात मा.श्री.के.डी.वटाणे साहेबांनी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रमात उत्साहाने भाग घेतला पाहिजे असे प्रतिपादन केले. यावेळी बहुसंख्य पालक व नागरिक उपस्थित होते.
        पुढील संपूर्ण आठवडा अशीच मेजवानी असणार आहे. त्यात उद्या उर्वरित सांस्कृतिक कार्यक्रम, दिनांक 22 तारखेपासून क्रीडा महोत्सव, दिनांक 25 जानेवारी रोजी स्वयंशासन दिन व आनंदनगरी असे भरगच्च कार्यक्रम असणार आहेत तरी सर्वांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन प्राचार्य श्री.बळीराम वटाणे यांनी केले.
        हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले तर श्री.कल्याण भोसले यांनी सूत्रसंचालन व श्री.डी.व्ही.पांडे सर यांनी आभार व्यक्त केले

No comments:

Post a Comment