तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 15 January 2020

टाकळगव्हाण येथे रासेयो शिबिराला प्रारंभप्रतिनिधी
पाथरी:- स्वा रा ती म विद्यापिठ, विष्णूपुरी नांदेड आणि स्व नितिन महाविद्यालय पाथरी यांच्या संयुक्त विद्यमाने टाकळव्हाण येथे १४ जानेवारी पासून  पर्यावरण व नैसर्गिक साधन संपत्ती संवर्धन व स्वच्छ भारत अभियान विषेश युवक शिबिराला प्रारंभ झाला.
या शिबिराचे उदघाटन बुधवार १५ जानेवारी रोजी टाकळगव्हाण चे सरपंच विश्वनाथ महिपाल महिपाल यांच्या हस्ते संपन्न झाले. या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्राचार्य डॉ राम फुन्ने हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून रासेयो परभणी चे जिल्हा समन्वयक प्रा डॉ सुरेश भालेराव, आंबटपुरे, तुकारामजी महिपाल, ग्रामसेवक जी एस देवडे, रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा मधूकर ठोंबरे, सह कार्यक्रमाधिकारी प्रा टि एफ काळे, प्रा डॉ जी जे मोरे यांची या वेळी उपस्थिती होती. या शिबिरात ग्रामस्वच्छता, अंधश्रध्दा निर्मुलन,पर्यावरण संवर्धन,आरोग्य संवर्धन, जल साक्षरता, महीला उदबोधन, व्यसनमुक्ती, हागणदारी मुक्त गांव असे कार्यक्रम संपन्न होणार आहेत.

No comments:

Post a comment