तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 17 January 2020

पातुर्डा प्राथमिक आरोग्य केंन्द्रातील वैधकिय अधिकारी , कर्मचा-याचे रिक्त पदे भरा अन्यथा आंदोलन लोकनियुक्त सरपंचश्रीमती शैलेजा भोंगळ यांचा इशारा मुख्यकार्यपालन अधिकारी यांना निवेदनसंग्रामपुर [ प्रतिनिधी] तालुक्यातील पातुर्डा गावाची लोकसंख्या १० हजाराच्या वर असुन व २३ खेडेगाव लागुन आहेत पातुर्डा गाव इतर खेडेगावाची लोकसंख्या विचारात घेता स्वर्गीय लालासेठ उर्फ भिकमचंद चांडक व स्वर्गीय माजी जि प अध्यक्ष सुर्यकांत बाहेकर यांनी प्रा आरोग्य केंन्द्र साठी शासनदरबारी तनमनधनाने सतत पाठपुरावा केल्याने पातुर्डा व परिसरातील खेडेगावाच्या शेतकरी शेतमजुरांच्या आरोग्य सुविधेसाठी प्राथमिक आरोग्य केन्द्र मंजुर झाले परंतु गेल्या काही वर्षा पासुन या प्रा केन्द्रांतील वैधकिय अधिकारी २ पदे, आरोग्य सेविका २ पदे, महिला परिचारीका १ , आरोग्य सहाय्यीका १ पद, कवठळ उपकेन्द्र आरोग्य सेवक १पद असे एकुण ७ पदे रिक्त असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे तर प्रा आरोग्य केन्द्रांत औषधचा पुरवठा अपुरा असल्याने आरोग्य केन्द्र शोभेची वस्तु बनली आहे रिक्त पदे भरण्यासाठी संबंधीत विभागाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला परंतु रिक्त पदाचा ग्रहण कायम असुन परिस्थिती जैसेथे रिक्त पदे भरण्यात यावे  पुरेसा औषध पुरवठा करावा करावा अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन छेडन्याचा इशारा लोकनियुकत्त सरपंच श्रीमती शैलजाताई भोंगळ यांनी मुख्यकार्यपालन अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातुन दिला आहे

1 comment: