तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 17 January 2020

शाळेचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठीचा दुसरा "संवाद" कार्यक्रम यशस्वी


प्रजासत्ताक दिनाची तयारीही जोरात

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  तालुक्यातील मौजे लिंबुटा येथे गुरुवार दि. १६जानेवारी रोजी दुपारी २.३० वाजता जि. प. प्राथमिक शाळेचा शैक्षणिक दर्जा सुधारण्या संदर्भात दुसऱ्यांदा प्रत्यक्ष संवाद कार्यक्रम घेण्यात आला .यापूर्वी शुक्रवार दि 13 डिसेंबर २०१९ रोजी प्रथम संवाद कार्यक्रम घेण्यात आला होता.                                                      प्रारंभी  प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमांची तयारी  ग्रा.पं.सदस्य व माजी सरपंच मोहन मुंडे,या संवाद कार्यक्रमाचे प्रमुख संवादक व परळीतील नागनाथ निवासी विद्यालयाचे मुख्याध्यापक विष्णुदास चव्हाण सर आणि सहशिक्षक डी.बी.मुंडे सर,तसेच विठ्ठल दगडू मुंडे,अशोक मुंडे ,आंगणवाडी सेविका सौ.सुमेधा श्रीराम मुंडे या सर्वांनी पाहिली . सहशिक्षिका एम.बी.घुमे मँडम याच्याकडूनअतिशय उत्तम प्रकारे ,नाटिका, गाणी आणि इतर तयारी करून घेतली जात आहे. त्याबद्दलही सर्वांनी समाधान व्यक्त केले.                                                   येथे इयत्ता १ली ते ४ थी पर्यंत शाळा आहे.शाळेचा शैक्षणिक दर्जा अत्यंत खालावल्यामुळे पालक आपली  मुलं या शाळेत ठेवायला तयार नाहीत. इयत्ता १ ली ते ४ थी पर्यंत केवळ २७ विद्यार्थी आहेत .त्यात ६ मुलं आणि २१ मुली यांचा समावेश आहे.                                                           संत गाडगे महाराज सेवाभावी संस्था,लिंबुटा ता.परळी संचलित सादग्राम निर्मिती प्रकल्प समिती,लिंबुटा  या समितिच्या माध्यमातून गावाची सादग्राम निर्मितीकडे(आदर्शगाव करण्याकडे) वाटचाल मागील मे २०१९ पासून सुरू  आहे. त्याचाच संवाद कार्यक्रम हा एक भाग आहे.मागील संवाद कार्यक्रमात प्रमुख संवादक विष्णुदास चव्हाण सर यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतेनुसार अंकज्ञान, गणितीय उदाहरणे ,भाषा ज्ञान, प्रकट वाचन ,आकलन क्षमता, प्रकटीकरण क्षमता,  यासंदर्भात काही विद्यार्थ्यांची पडताळणी केली होती .उर्वरित ८ विद्यार्थ्यांची या संवाद कार्यक्रमात पडताळणी करण्यात आली. विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती चांगली असल्याचे निदर्शनास आल्याने श्री चव्हाण सर आणि श्री मुंडे सर यांनी यावेळी समाधान व्यक्त केले.विध्यार्थ्यांंच्या या शैक्षणिक प्रगतीबद्दल त्यांनी येथे प्रतिनियुक्तीवर असलेल्या सहशिक्षिका मनोरमा भाऊराव घुमे यांचे कौतूक केले.त्यांना मुख्याध्यापक रामराव जाधव यांचे चांगले सहकार्यही मिळत आहे.प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारी रोजी  होणारा कार्यक्रमही प्रथमच सर्वांच्या उपस्थित गावातील मंदिरवर तयारीणीशी घेण्याचा निर्णय सर्वानुमते यावेळी  घेण्यात आला.

No comments:

Post a Comment