तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 11 January 2020

डाॕ.नितीन राऊत ऊर्जामंञी यांनी सागंली ञैवार्षीक अधिवेशनाचे निमंत्रण स्विकारले

 (प्रतिनिधी) :- 
     महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे अध्यक्ष काॕ.मोहन शर्माजी,आॕल इंडिया ट्रेड युनियन काॕग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणिस काॕ.शाम काळे,फेडरेशनचे सयुंक्त सचिव काॕ.पि.व्ही.नायडू,SNDL सघंटना प्रतिनिधी काॕ.सचिन काळबाडे व काॕ.नितिन शेंद्रंरे व इतर पदाधिकारी यांनी दि.११.१.२०२० रोजी नागपूर येथे डाॕ.नितीन राऊत ऊर्जामंञी यांची भेट घेतली. मोहन शर्मा यांनी सघंटने बदल माहिती दिली व दि.७,८,९ फ्रेबुरवारी २०२० रोजी  सागंली येथे सघंटनेचे ञैवार्षीक राज्य अधिवेशन आयोजित केले आहे. आपण दि.९.२.२०२० रोजी होणाऱ्या खुल्या अधिवेशनाचे उदघाटक म्हणून उपस्थित रहावे हि केलेली विनंती ऊर्जामंञी महोदय यांनी स्विकारली असुन ते अधिवेशनात उपस्थित राहुन वीज कामगार व अभियंते याना सबोंधित करणार आहेत.
      ऊर्जामंञी महोदय यांच्या सघंटनेच्या वतीने निदर्शनास आणुन देण्यात आले कि महावितरण कंपनी नागपूर येथे SNDL फ्रेन्चाईसी मध्ये ९ वर्षापासुन कामगार कार्यरत होते.आता SNDL कंपनी महावितरण कंपनीने ताब्यात घेतली आहे.हे कामगार सदया कंञाटी पध्दतीने महावितरण कंपनीत काम करत आहेत.जर या कामगारांना कामावरुन कमी केले तर त्यांच्या उदर निर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार आहे.या कामगारांना महावितरण कंपनी सामावून घ्यावी हि मागणी सघंटनेने केली असता मंत्री महोदय यांनी याबाबत लवकरच बैठक घेवुन धोरण ठरविण्यात येईल हे स्पष्ट केले.

No comments:

Post a comment