तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 14 January 2020

अभिनव विद्यालयात राजमाता जिजाऊ व युवकांचे प्रेरणास्रोत स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- ज्ञान प्रबोधिनी विकास शिक्षण प्रसारक मंडळ  संचलित अभिनव विद्यालय येथे  राजमाता  जिजाऊ  व  युवकांचे  प्रेरणास्थान  स्वामी विवेकानंद  यांची जयंती  मोठ्या उत्साहात  संस्थेचे  अध्यक्ष राजाभाऊ जब्दे व संस्थेचे सचिव  परळी भूषण  साहेबराव फड  यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली  यावेळी कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून संस्थेचे सचिव परळी भूषण साहेबराव फड उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून सहशिक्षक  सूर्यकांत आनकाडे, निलेश व्हावळे , इम्रान खान शिक्षिका ज्योती शिंदे ,शीला झेंडे व्यासपीठावर उपस्थित होत्या या कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली या कार्यक्रमांतर्गत शाळेतील असंख्य विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद यांची मुलांनी वेशभूषा व राजमाता जिजाऊ यांची वेशभूषा मुलींनी सादर करून आपले विचार मांडले तसेच प्रमुख अतिथी शीला झेंडे यांनी राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल  माहिती दिली जिजामाता, जिजाऊ, राजमाता, माँसाहेब१२ जानेवारी इ.स. १५९८ - १७ जून , इ.स. १६७४ ह्या मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई होत्या. सिंदखेडचे लखुजी  जाधव हे जिजाबाईचे वडील व आईचे नाव म्हाळसाबाई होते. जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते. डिसेंबर इ.स. १६०५ मध्ये जिजाबाईंचा शहाजीराजांशी दौलताबाद येथे विवाह झाला
शहाजी राजे बंगळूरात वास्तव्यास असतांना त्यांच्या आई व वडिलांची चोख जबाबदारी जिजाबाईंनी मोठया कौशल्याने पेलली. सईबाईंच्या पश्चात संभाजी राजांचीही संपूर्ण जबाबदारी त्यांनी उचलली.
राजांच्या प्रथम पत्‍नी, सईबाईंचे भाऊ बजाजी निंबाळकर यांना जुलमाने बाटवण्यात आले होते. त्यांची हिंदू धर्मात परत येण्याची इच्छा होती, राजांचाही त्याला पाठिंबा होता. या धर्मराजकारणात जिजाबाई राजांच्या पाठीशी ठाम उभ्या राहिल्या. एवढेच नव्हे तर राजांची कन्या सखुबाईंना, बजाजी निंबाळकरांच्या मुलाला देऊन त्यांनी राज-सोयरीक साधली आणि बजाजींना पूर्णपणे धर्मात परत घेतले. या संपूर्ण प्रकरणात त्यांचा द्रष्टेपणा व सहिष्णूता दिसून येते.राजांच्या सर्व स्वार्‍यांचा, लढायांचा तपशील त्या ठेवत. त्यांच्या खलबतांत, सल्ला मसलतीत भाग घेत. राजांच्या गैरहजेरीत स्वत: राज्याची धुरा वहात. शिवाजी राजे आग्र्याच्या कैदेत असताना राज्याची पूर्णत: जबाबदारी उतारवयातही जिजाबाईंनी कौशल्याने निभावून नेली.शिवाजी राजांचा राज्याभिषेक व हिंदवी स्वराज्याची स्थापना पाहून राज्याभिषेकानंतर बारा दिवसांनी १७ जून, इ.स. १६७४ ला त्यांनी स्वतंत्र हिंदवी स्वराज्यात शेवटचा श्वास घेतला, आपल्या वयाच्या ८० व्या वर्षी जिजाबाईंचे रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावी वृद्धापकाळाने निधन झाले,या गावी राजमाता जिजाबाईंची समाधी आहे.
जिजाबाई ही आपल्या मनात तयार असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन व पराक्रम अशा राजस व सत्त्वगुणांचे बाळकडू देणार्‍या राजमाता होय. त्यानंतर दुसरे प्रमुख अतिथी सूर्यकांत अानकाडे यांनी तरुणांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या विषयी माहिती सांगितली
स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव नरेंद्रनाथ. स्वामी विवेकानंद यांचा जन्म १२ जानेवारी १८६३ रोजी कोलकात्यात झाला. बालपणापासून विवेकानंदांच्या वर्तणुकीत दोन गोष्टी प्रकर्षाने दृष्टोत्पत्तीस येऊ लागल्या. त्या म्हणजे ते वृत्तीने श्रद्धाळू व कनवाळू होते व दुसरे म्हणजे ते बालपणात कोणतेही साहसी कृत्य बेधडकपणे करत. स्वामी विवेकानंदांचे संपूर्ण कुटुंब अध्यात्ममार्गी असल्यामुळे बालपणात त्यांच्यावर धर्मविषयक योग्य संस्कार झाले
श्रेष्ठतम अशा हिंदु धर्माची ओळख या सुवर्णभूमीतील सत्पुरुषाने जगाला करून देणे हा दैवी योगच होता. अमेरिकेतील शिकागो येथे ११ सप्टेंबर १८९३ रोजी झालेल्या सर्वधर्मपरिषदेच्या माध्यमातून सार्‍या जगाला आवाहन करणारे स्वामी विवेकानंद हिंदु धर्माचे खरे प्रतिनिधी ठरले. सोमवार, ११ सप्टेंबर १८९३ रोजी सकाळी धर्मगुरूंच्या मंत्रोच्चारानंतर संगीतमय वातावरणात धर्मपरिषदेचा शुभारंभ झाला. व्यासपीठावर मध्यभागी अमेरिकेतील रोमन कॅथलिक पंथाचे धर्मप्रमुख होते. स्वामी विवेकानंद हे कोणत्याही एका विशिष्ट पंथाचे प्रतिनिधी नव्हते. ते सार्‍या भारतवर्षातील सनातन हिंदु वैदिक धर्माच्या प्रतिनिधीच्या नात्याने या परिषदेस आले होते. या परिषदेस सहा ते सात हजार स्त्री-पुरुष उपस्थित होते. अध्यक्षांच्या सूचनेनुसार व्यासपीठावरील प्रत्येक प्रतिनिधी आपली अगोदरच तयार केलेली भाषणे वाचून दाखवत होते. स्वामीजींनी आपले भाषण लिहून आणले नव्हते. शेवटी गु

No comments:

Post a comment