तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 16 January 2020

" मिरा भाईंदर महानगरपालिका वार्ताहर संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार प्रकाश नागणे यांचा सत्कार "नवघर भाईंदर पूर्वेकडील ज्येष्ठ नागरिक विरंगुळा संस्थेत प्रत्येक महिन्याच्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी  गणपतीची महाआरती आयोजित केली जाते . यावेळी गणपतीच्या महाआरती करण्याचा मान ज्येष्ठ पत्रकार प्रकाश नागणे यांना देण्यात आला होता . गणपती बाप्पाच्या महाआरती नंतर
 ज्येष्ठ नागरिक विरंगुळा संस्थेच्यावतीने संस्थेचे उपाध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार अनंत आंगचेकर आणि संस्थेचे प्रमुख मार्गदर्शक ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मण राजे यांच्या हस्ते मिरा भाईंदर महानगरपालिका वार्ताहर संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार प्रकाश नागणे यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला . यावेळी सक्तार मूर्ती  ज्येष्ठ पत्रकार प्रकाश नागणे यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना मिरा भाईंदर परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या दूर करण्यासाठी संस्थेला सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले . या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष दिलीप पवार , महिला आघाडीच्या अध्यक्षा अनुराधा राणे , संस्थेच्या कार्यकारिणेचे सर्व पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते . या कार्यक्रमात शेवटी संस्थेचे अध्यक्ष दिलीप पवार यांनी आभारप्रदर्शन केले . सर्व उपस्थितांना महाप्रसादाचे वाटप केल्यानंतर राष्ट्रगीताने समारोप करण्यात आला .


लक्ष्मण राजे

No comments:

Post a Comment