तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 11 January 2020

संत भगवानबाबा पुण्यतिथी निमित्त ह.भ.प.प्रभाकर झोलकर महाराज यांचे किर्तन संपन्न


 वैजनाथ (प्रतिनिधी) ः-
येथील थर्मल कॉलनी मध्ये श्रीराम मंदिर परिसरात श्री.संत भगवानबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्ताने वैराग्यमुर्ती ह.भ.प.प्रभाकर महाराज झालेकर यांचे किर्तन संपन्न झाले.
थर्मल कॉलनीतील श्रीराम मंदिरात सकाळी 9 वाजता संत भगवानबाबा यांच्या प्रतिमचे पुजन करण्यात आले. सकाळी 10 वाजता ह.भ.प.दिनकर महाराज यांचे प्रवचन तर दुपारी 12 वाजता वैराग्यमुर्ती ह.भ.प.प्रभाकर महाराज झोलकर यांचे किर्तन संपन्न झाले. त्यांनतर येणार्‍या भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. झोलकर महाराजांनी आपल्या किर्तनातून संत भगवानबाबा यांच्या जिवनावर प्रकाश टाकला.  या कार्यक्रमास थर्मल कॉलनी परळी शहर व परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन श्री.संत भगवानबाबा सेवा मंडळाच्या वतीने करण्यात आले होते.

No comments:

Post a comment