तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 19 January 2020

तंटामुक्ती व कायदेविषयक जागृतीसाठी अभियानप्रा. डॉ. संतोष रणखांब, तेजन्यूज हेडलाईन्स प्रतिनिधी
सोनपेठ : येथील पोलीस प्रशासनाच्या वतीने ग्रामीण भागातील शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधत विद्यार्थी आणि महिला सुरक्षा संबंधाने मार्गदर्शन केले. गावातील परिस्थितीची माहिती घेत गाव तंटामुक्त करण्यासाठी, तसेच शांतता राहण्याच्या संदर्भाने ग्रामस्थांशी संवाद  पी.आय.भातलवंडे, एपीआय भिकाने, एपीआय सोमवंशी यांनी उपक्रम राबवले. 
सोनपेठ तालुक्यात कायदा व सुव्यवस्था, तसेच तंटामुक्ती संदर्भात गावकऱ्यांशी चर्चां करून विद्यार्थी व महिला विषयक कायदे याबद्दल माहीती दिली ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजानन भातलंवडे यांनी धारासुर , एपीआय भिकाने यांनी गोंडगाव तर एपीआय सोमवंशी यांनी मव्हाळा या गावांना भेटी दिल्या
ग्रामस्थांशी संवाद साधला, तसेच याबाबत बैठका घेतल्या.
पोलीस प्रशासनाच्या या कार्याबद्दल ग्रामस्थ, विद्यार्थी व कायदाप्रेमी नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. सर्वच पोलीस कर्मचाऱ्यांनी तालुक्यात जनजागृतीसाठी परिश्रम घेत असलेले पाहून जनतेमधून पोलीसांना सहकार्याची भावना निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे.

No comments:

Post a comment