तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 19 January 2020

कृष्णाई ईन्फास्ट्रक्चर कंपनीने रसत्याचे सुरु असलेले कामात मनमानी कारभार थांबवावा अन्यथा लोकशाही मार्गाने काम बंद आंदोलनसंग्रामपुर [ प्रतिनिधी] तालुक्यात रस्त्याच्या कामात सुरु असलेली मे.कृष्णाई इन्फास्ट्रक्चर पुणे कंपनीकडून मनमानी थांबवावा अन्यथा लोकशाही मार्गाने काम बंद आंदोलन छेडण्याचा इशारा तहसिलदार मार्फत जिल्हाधिकारी यांना राकॉचे माजी तालुकाध्यक्ष शे.लुकमान शे.सुभान यांनी दिलेल्या निवेदनातुन दिला आहे. निवेदनात नमुद केले की, तालुक्यातील खांडवी - कवठळ – पातुर्डा फाटा तसेच कवठळ - संग्रामपूर या दोन रस्त्याचे काम चालु आहे .या रस्त्याच्या कामावर सदर कंपनीकडून अत्यंत निकृष्ट व कमी मटेरीअलचा वापर करण्यात येत असून मुरुम ऐवजी पिवळ्या मातीचा व माती मीश्रीत रेतीचा वापर करण्यात येत आहे. तसेच रस्त्याची व्यवस्थीत खोदाई व दबाई न करता काम करण्यात येत आहे . सदर काम अंदाज पत्रका नुसार चालु नसुन काम खुप निकृष्ट दजचि होत आहे . या बाबत गावातील नागरीकांनी बरेचवेळा तकारी करुनही तसेच संबधीत अधिका - यांना सांगुनही काहीच कार्यवाही करण्यात आलेली नाही . सदर कंपनीकडून कामावर कवठळ , पेसाडा , भोन , सावळी इत्यादी गावातील हऱ्हास न झालेल्या नदीमधुन अवैध रेती आणुन रस्त्याचे कामासाठी वापर करीत आहे . सदरहु कंपनीच्या आवारात अवैध रेतीचा मोठ्या प्रमाणात ढीगारा पडलेला आहे . मात्र कंपनी दुरवरच्या बाहेरगावाच्या रायल्टी दाखवून व त्यामध्ये खोडतोड करुन शासनाची दिशाभुल करुन फसवणुक करीत आहे . तसेच या कपंनीने सरकारी जमीनीचा शासनाची कोणतीच परवानगी न घेता ताबा करुन अतिकमण केले आहे याबाबत तहसिलदार यांना पत्रही दिले असुन कोणतीच कार्यवाही झाली नाही . या दोन्ही रस्त्याच्या निकृष्ट कामाची गुणनियंत्रक विभागाकडून चौकशी करावी . स्वतः या ठिकाणी येउन चौकशी करून कार्यवाही करावी व मे . कृष्णाई इम्फास्ट्रक्चर पुणे कंपनीचा मनमानी कारभार थांबवावा अन्यथा गावातील लोकांना सोबत घेउन रस्त्याचे सुरु असलेले निकृष्ट काम बंद पाडण्यात येइल .अशा इशारा निवेदनातुन राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष शे.लुकमान शे.सुभान यांनी जिल्हाधिकारी यांना दिला आहे

No comments:

Post a comment