तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 11 January 2020

चिखली येथे हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ


संत झोलेबाबा यात्रा महोत्सव 

फुलचंद भगत
मंगरुळपीर -तालुक्यातील शेलूबाजारनजीकच्या श्रीक्षेत्र चिखली येथे आज संत झोलेबाबा यांच्या ५५व्या यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी ४ वाजता भव्य महाप्रसादाचे महापंगतीत वितरण केले यामध्ये हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
           यात्रेनिमित्त दि.१०जानेवारी रोजी सकाळी ४वाजता संत झोलेबांबाच्या मुर्तीची महापूजा अभिषेक , सकाळी ६ वा.महाआरती, सकाळी ९ वा.अभिषेक पूजा, सकाळी ११वा होमहवन व आरती, दुपारी ४ वा.महाप्रसाद पार पडला.महाप्रसादाच्या वेळी युवा मारवाडी मंचच्या वतीने मोफत पिन्याच्या पान्याची व्यवस्था करन्यात आली होती.दरवर्षिच पाणीव्यवस्थेची जबाबदारी या संघटनेकडुन होत असल्याने संस्थाकडुन आभार व्यक्त करन्यात आले.सायं ७ वा.श्री झोलेबाबांच्या जिवनावर आधारित गितगायन कार्यक्रमही सादर करन्यात आला.

फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम
मो.9763007835

No comments:

Post a comment