तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 17 January 2020

शिवसेनेच्या परळी वै ते तुळजापूर पायी दिंडीत मोठया संख्येने सहभागी व्हावे - तुकाराम नरवाडेपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- शिवसेना प्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना जनसेवेसाठी बळ मिळावे यासाठी परळी तालुका शिवसेनेच्या वतीने परळी वैजनाथ ते तुळजापूर पायी दिंडी चे आयोजन करण्यात आले आहे या दिंडीस शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन परळी येथील शिवसेनेचे तुकाराम नरवाडे यांनी केले आहे. 

     महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानी च्या आशीर्वादाने व जनतेच्या प्रेमाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब हे मुख्यमंत्री झाले त्यांना जनसेवेसाठी  बळ मिळावे हे साकडे घेऊन शिवसेना नेते चंद्रकांतजी खैरे, बीड जिल्हा संपर्क प्रमुख आनंद जाधव, शिवसेना जिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांच्या मार्गदर्शनाखाली  शिवसैनिकांचे श्रद्धास्थान हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त दिनांक १९ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेऊन पायी दिंडीस सुरुवात होणार आहे पुढे अंबेजोगाई -मुरुड-तेर-धाराशिव मार्गे आराधी व गोंधळ्यांच्या समूहासह गावागावात भवानी मातेचा जागर करत ही दिंडी  दिनांक २३ जानेवारी रोजी  तुळजापूर येथे ठीक दुपारी १२ वाजता पोहचणार आहे तेथे आई जगदंबेची महापूजा करून तुळजा भवानीस साकडे घालण्यात येणार असून या भक्तिमय वातावरणातील दिंडीत शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन येथील कट्टर शिवसैनिक तुकाराम नरवाडे यांनी केले आहे.

No comments:

Post a comment