तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 16 January 2020

गोवत्स प.पू.श्री.राधाकृष्णजी महाराज यांच्या श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञाचे प्रभू वैद्यनाथ नगरीत आयोजन


होत्सव ; प.पु. अमृताश्रमस्वामी व संजय महाराज पाचपोर यांचे किर्तन 

सात दिवस प्रभातफेरी सह पवित्र धार्मिक वातावरण


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि.१६ - आपल्याला लाभलेली धार्मिक संस्कृती प्रचंड मोठी आहे.या धार्मिक परंपरेत १८ पुराणांना महत्त्व आहे.या १८ पुराणांचा सार ज्या महापुराणात आहेत, अशा श्रीमद् भागवत महापुराण ज्ञानयज्ञाचे आयोजन देशातल्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथाच्या पावन भूमीत करण्यात आले आहे.जगद् विख्यात संत गोवत्स परम् विठ्ठलभक्त श्री. राधाकृष्णजी महाराज यांच्या पावन सानिध्यात हा सोहळा होणार आहे.शहरातील नंदकिशोर जाजू व श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ समिती मार्फत हे भव्य दिव्य आयोजन करण्यातआले आहे.
        
श्रीमद् भागवत कथेचे आयोजन परळी येथील नंदधाम हालगे गार्डन,परळी येथे सोमवार २० जानेवारी ते रविवार दि.२६ जानेवारी दरम्यान करण्यात आले असून या भव्य आयोजनाची जय्यत तयारी सुरू आहे. या कथेदरम्यान कीर्तन महोत्सवाचे आयोजनही करण्यात आले असून महाराष्ट्रातील प्रसिद्ध किर्तनकार हभप प.पु. अमृताश्रमस्वामी (अमृत महाराज जोशी) व ह.भ.प. संजय महाराज पाचपोर यांची किर्तनकार होणार आहेत. परळी पंचक्रोशीतील भाविक भक्तांना एक पर्वणीच असणार आहे.या ७ दिवसात प्रतिदिनी सकाळी ६ वाजता महाराजांसमवेत प्रभातफेरी जाजुवाडी विठ्ठल मंदिरापासून निघून शहरातील विविध भागात जाणार आहे.
         
भागवत कथेच्या प्रारंभी सोमवार दि.२० जानेवारी २०२० रोजी पारंपरिक वाद्यासह भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे.या शोभायात्रेत शहरातील विविध भजनी मंडळ, संघटना सहभागी होणार असून अभूतपूर्व अशी ही शोभायात्रा विठ्ठल मंदीर जाजुवाडी येथून प्रारंभ होऊन पुढे-आर्यसमाज मंदिर-भवानी नगर-कृषी उत्पन्न बाजार समिती-राणी लक्ष्मीबाई टॉवर-गणेशपार रोड-गणेशपार-नांदूरवेस -अंबेवेस मार्गे कथास्थळी दुपारी १ वा.पोचणार आहे.यानंतर दररोज दुपारी १.३० ते सायं ६.०० वाजेपर्यंत कथावाचन विवेचन  होणार आहे.
         
हा सोहळा शिस्तबद्ध रीतीने पार पाडण्यासाठी विविध समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.या समित्यांमध्ये स्वागत समिती, सल्लागार समिती,शोभायात्रा समिती,कार्यालय समिती,बैठक समिती,भोजन समिती, प्रभातफेरी समिती,व्यासपीठ संचलन समिती, प्रसिद्धी व कीर्तन समिती,प्रसाद समिती,आरोग्य समिती,नियोजन वाहन समिती,महिला समिती स्थापन करण्यात आल्या असून कथेसाठी येणाऱ्या भाविकांना कुठलिही गैरसोय होणार नाही याची काळजी आयोजकांनी घेतली आहे.

परळीत या आधीही २०१२ साली दरक,लाहोटी परिवारांनी श्री गोविंददेव गिरीजी (श्री किशोरजी व्यास),२०१८ साली खाटूवाला परिवार यांनी श्री गिरीबापूजी यांची शिवकथा तर श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्ट तर्फे जगद् विख्यात ज्योतिषी तथा भागवताचार्य प.अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांच्या भागवत कथेचे आयोजन करण्यात आले होते.वैद्यनाथाच्या पावन भूमीत होता असलेल्या या श्रीमद् भागवत ज्ञानयज्ञ सोहळ्याला परिसरातील सर्व भविक भक्तांनी उपस्थित राहून भगवान श्रीकृष्णाच्या लीलांच्या कथा माध्यमातून रसपान करावे असे आवाहन समिती मार्फत करण्यात आले आहे.श्रीराधाकृष्णजी महाराज यांच्या समवेत शहरात दररोज निघणार प्रभात फेरी
      
प.पू.राधाकृष्णजी महाराज यांच्या सोबत सकाळी ६ वा शहरात विविध भागात सहा दिवस प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले असून यातुन धार्मिक, सामाजिक संदेश देण्यात येणार आहे.दि.२० रोजी अग्रवाल लॉज-बाजार समिती-जाजुवाडी,दि.२१ रोजी जाजुवाडी टॉवर-लड्डा गूळ दुकान ते जाजुवाडी,दि.२२ रोजी हनुमान मंदिर मोंढा-सुभाष चौक-आर्यसमाज कॉर्नर-घरणीकर रोड -शिवम किराणा,दि २३ रोजी श्री बाबारामदेव मंदिर-गणेशपार-जैन मंदिर-अंबेवेस-बालाजी मंदिर-देशमुख पार-दत्त मंदिर,दि.२४ रोजी साई मंदिर विद्यानगर-अग्रवाल-मेनकुदळे-आलदे प्रॉव्हिजन-सारडा-गजानन महाराज मंदिर,दि.२५ रोजी हनुमान मंदिर मोंढा- वैद्यनाथ बँक-अरुणोदय मार्केट-नाथ रोड-गुरुकृपा नगर-प्रेम पन्ना नगर-सरदार सायकल हनुमान मंदिर मोंढा येथे समाप्ती.असा प्रभात फेरीचा मार्ग असणार आहे.


गोवत्स श्री राधाकृष्णजी महाराज
      
गोवत्स श्री राधाकृष्णजी महाराज हे जगद्विख्यात कथाप्रवक्ते म्हणून सुप्रसिद्ध आहेत.त्यांचे गौ सेवेतील अनंत योगदान आहे.गौ मातेच्या सेवेसाठी ते सदैव अग्रेसर असतात.राजस्थान येथील पथमेडा गौ-शाळेत साधारण दीड लाख गायींचे संगोपन त्यांच्या मार्गदर्शनाखाली केले जाते.आजारी गाईंसाठी अत्याधुनिक दवाखाना या गौशाळेत असून विविध आजारग्रस्त गाईंवर औषधोपचार येथे केले जातात.महाराजांची कथा ज्या गावात असेल त्या गावात नित्य प्रभातफेरी काढली जाते या प्रभातफेरी

No comments:

Post a Comment