तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 14 January 2020

मुंडे - दौंड राजकीय शत्रुत्व ते मैत्रीपरळीच्या राजकारणात मागील 35 वर्षांपासून मुंडे आणि दौंड कुटुंबातील राजकीय शत्रुत्व सर्वश्रुत आहे.

आज ज्या संजय दौंड यांना विधानपरिषदेची उमेदवारी दिली आहे त्या संजय दौंड यांचे वडील पंडितराव दौंड यांनी 1985 मध्ये स्व. गोपीनाथराव मुंडे यांचा पराभव केला होता. ते काही दिवस राज्यमंत्रीही होते. मात्र त्यानंतर ते पुन्हा कधीही निवडून आले नाहीत. 

90, 99 साली विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.

धनंजय मुंडे यांनी संजय दौंड यांचा 2 वेळा जिल्हा परिषद निवडणुकीत पराभव करून विजय मिळवला तर एक वेळा संजय दौंड यांनी पोटनिवडणुकीत धनंजय मुंडे यांचे बंधू अजय मुंडे यांचा पराभव केला

आज त्याच संजय दौंड यांना उमेदवारी मिळावी म्हणून धनंजय मुंडे यांनी प्रयन्त केले तर धनंजय मुंडे यांच्या विजयासाठी दौंड पिता पुत्रानी मेहनत घेतली.

आज या निमित्ताने शत्रुत्व ते मैत्री असे सर्कल पूर्ण झाले आहे.

No comments:

Post a comment