तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 15 January 2020

परळीत मकर संक्रांति सण उत्साहात साजरा

श्री.प्रभू वैद्यनाथ व श्री संत जगमित्र नागा मंदिरात दर्शनासाठी महिलांची गर्दी 

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  शहरात बुधवारी मकर संक्रांति सण उत्साहात साजरा करण्यात आला .सकाळी प्रभू वैद्यनाथ व श्री संत जगमित्र नागा मंदिरात दर्शनासाठी महिलांची गर्दी झाली होती  .शहरातील हमाल  संघटनेच्यावतीने  पारंपारिक पध्दतीने गुळ- साखरा ची शेरणी वाजत गाजत वैजनाथाला आणली, गुळ साखराची  शेरणी  मंदिर पायऱ्यांवर व शहरात वाटण्यात आली .श्री आय्याप्पा सेवा ट्रस्टच्यावतीने आयाप्पा मंदिरात मकर संक्रांतीचे विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले व सायंकाळी  भव्य मिरवणूक काढण्यात आली .सकाळी वैद्यनाथ मंदिरात आयाप्पांची मिरवणूक  आली त्यानंतर वैद्यनाथ  दर्शनमंडपात श्री वैद्यनाथ मंदीराचे विश्वस्त प्रा प्रदिप देशमुख यांच्या हस्ते आरती करण्यात आली, परळीत स्थायिक झालेलं केरळीयन नागरिकांच्या वतीने आयाप्पा मंदिरात बुधवारी कार्यक्रम घेण्यात आले, आयप्पा मंदिरात मकरसंक्रांतिचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी झाली होती.

No comments:

Post a Comment