तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 11 January 2020

आता ‘नांदेड-पनवेल-नांदेड’ एक्सप्रेस दररोज धावणार परळीतून रेल्वेने प्रवास करणार्‍या जिल्हावासियांचाबीड, (प्रतिनिधी) :- येत्या फेब्रुवारी महिण्यापासून ‘नांदेड-पनवेल-नांदेड’ ही एक्स्प्रेस दररोज धावणार आहे. परळीतून रेल्वेने प्रवास करणार्‍या जिल्हावासियांचा प्रश्‍न खा. प्रीतमताईंनी रेल्वे मंत्र्यांकडून सोडवून घेतला आहे. बीङ जिल्ह्यातील नागरिकांना मुंबईला जाण्याची सोय व्हावी, या अनुषंगानेच सदर एक्स्प्रेस दररोज सुरू ठेवावी, अशी मागणी खा. प्रीतमताईंनी केली होती, अखेर ती मागणी रेल्वे विभागाकडून मान्य करण्यात आली असून सदर प्रश्‍न मार्गी लावल्याबद्दल आता संपूर्ण जिल्हाभरातून खा. प्रीतमताईंचे आभार मानले जात आहेत.
नगर-बीड-परळी हा बीडकरांच्या स्वप्नातील रेल्वे मार्ग आहे, या मार्गासाठी लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे यांनी आटोकाट प्रयत्न केले, त्यांच्यानंतर मुंडे भगिणींनी या रेल्वे मार्गासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून तब्बल 2850 कोटी रूपयांची तरतूद करून घेतली, या तरतूदीमुळेच आज नगर-बीड-परळी रेल्वे मार्गाचे काम गतीने सुरू आहे, येत्या काही महिण्यातच हे काम पुर्णत्वास जाणार आहे, या रेल्वे मार्गाबरोबरच लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली खा. प्रीतमताईंनी इतर रेल्वे मार्गासाठी सातत्याने प्रयत्न केले, जिल्ह्यात परळीत रेल्वेचे स्थानक आहे, या ठिकाणी ज्या ज्यावेळी समस्या निर्माण झाल्या, त्या त्यावेळी खा. प्रीतमताई मुंडे धावून गेल्या, विशेष म्हणजे त्या समस्या त्यांनी थेट रेल्वे मंत्र्यांच्या कानावर घातल्या, त्यामुळेच त्या समस्यांचे निराकण झाले, परळीतून रेल्वेने प्रवास करणार्‍या नागरिकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी खा. मुंडे नेहमीच तत्पर असतात, त्याअनुषंगानेच त्यांनी ‘नांदेड-पनवेल-नांदेड’ या एक्सप्रेसकडे मागच्या काही दिवसांपुर्वी लक्ष वेधले होते, ही एक्सप्रेस (17614/17613) आठवड्यातून सहा दिवस  धावते. जिल्ह्यातून रेल्वेने पुणे आणि मुंबईला जाणार्‍या प्रवाशांची संख्या मोठी आहे, त्यामुळे या प्रवाशांना प्रवासासाठी चांगली सोय व्हावी याकरिता ‘नांदेड-पनवेल-नांदेड’ ही एक्सप्रेस आठवड्यातून सर्वच दिवस सुरू ठेवावी, अशी मागणी खा. प्रीतमताईंनी रेल्वे मंत्र्यांकडे केली होती, त्यानुसार खा. प्रीतमताईंच्या मागणीला यश आले असून सदर एक्सप्रेस आता दररोज धावणार आहे. खा. प्रीतमताई मुंडे यांच्या कार्यालयाला देण्यात आलेल्या पत्रात रेल्वे बोर्डाने म्हटले आहे की, गाडी क्र. 17614 (नांदेड ते पनवेल एक्स्प्रेस) जी आठवड्यातून  सहा दिवस धावत होती (शनिवार वगळून), ती गाडी येत्या 1 फेब्रुवारी 2020  पासून दररोज धावणार आहे. तसेच  17613 (‘पनवेल ते नांदेड एक्स्प्रेस) ही गाडी आठवड्यातून सहा दिवस (रविवार वगळून) धावत होती, ती आता दोन फेब्रुवारीपासून दररोज धावणार आहे. ही एक्सप्रेस नांदेड, परभणी, गंगाखेड, परळी, लातूर, कुर्डूवाडी, पुणे ते पनवेल अशी धावते, ती परळीत दररोज रात्री आठच्या सुमारास येते तर सकाळी सव्वा नऊ वाजता पनवेलला पोहचते, आता ही एक्सप्रेस फेब्रुवारी महिण्यापासून दररोज सुरू राहणार आहे, त्यामुळे जिल्ह्यातील प्रवाशांची मोठी सोय होणार असून सदर प्रश्‍न सोडवून घेतल्याबद्दल खा. प्रीतमताईंचे संपूर्ण जिल्हाभरातून आभार मानले जात आहेत.

No comments:

Post a comment