तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 19 January 2020

नाथरा येथे भरगच्च कार्यक्रमांनी पाचव्या ग्रामिण मराठी साहित्य संम्मेलनाचा समारोप

  
साहित्य रसिकांची प्रचंड उपस्थिती ; विविध क्षेत्रातील मान्यवरांचा संम्मेलनात झाला गौरव

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-
17 जानेवारी रोजी सुरु झालेले दोन दिवसीय पाचवे नाथरा येथील ग्रामिण मराठी साहित्य संम्मेलन भरगच्च कार्यक्रमांनी व साहित्य रसिकांच्या प्रचंड उपस्थितीत संपन्न झाले. प्रसिध्द साहित्यीक प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे यांच्या हस्ते 17 जानेवारी रोजी तालुक्यातील नाथरा येथे उद्घाटन झाले. तर आज दुसर्‍या दिवशीय महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात काम करणार्‍या गुणवंत्तांचा साहित्य संम्मेलनाच्या वतीने पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
नाथरा येथील पापनाथेश्वर विद्यालयाच्याय प्रांगणात दि.17 रोजी पाचव्या ग्रामिण मराठी सहित्य संम्मेलनाचे उद्घाटन सकाळी 11 वाजता प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यापुर्वी नाथरा येथे ग्रंथदिंडी काढण्यात आली. यावेळी बोलतांना प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे म्हणलो की, ग्रामिण भागातील या साहित्य संम्मेलनामुळे निश्चितच नवलेखकांना प्रोत्साहन मिळेल. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीनाथ मानव सेवा मंडळाचे अध्यक्ष डॉ.एकनाथ मुंडे हे होते. यावेळी प्रमुख पाहुणे डॉ.संतोष मुंडे, बीड येथील प्रसिध्द साहित्यीक अनंत कराड, प्राचार्य विधाते, कवी रंगनाथ मुंडे, पाटोदाचे प्रा.डॉ.महादेव मुंडे, नागनाथ बडे, मुख्याधिपिका सुलेखा कराड, अ‍ॅड.शुभांगी गित्ते,  व्याख्याते चंद्रकांत हजारे आदी मान्यंवर उपस्थित होते.  सौ.कमलबाई मुंडे यांची या संम्मेलनाच्या आयोजनासाठी महत्तवाची भुमिका निभावली.
उद्घाटना नंतर दुपारच्या सत्रात ज्येष्ठ कवी रंगनाथ मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली कवी संम्मेलन संपन्न झाले. या कवी संम्मेलनात नागनाथ बडे, केशव कुकडे, बालाजी कांबळे, अनंत मुंडे, प्रा.राजकुमार यल्लावाड, दत्ता वालेकर, सतु जाधव, वामन जयवीर, सिध्देश्वर इंगोले, दिवाकर जोशी, रमेश मोटे, विश्वांभर वराट, रामकिशन केकान प्रा.सौ.चेतना गोर शेट्टे, सौ.सुनिता कोमावांर, विजयाताई दहिवाळ, सुचिता करमाळकर, पल्लवी निर्मळे आदीं आपल्या उत्कृष्ट कविता सादर केल्या.
दुसर्‍या दिवसीय सकाळी प्रसिध्द कथाकार भास्कर बडे यांनी पाचव्या ग्रामिण मराठी साहित्य संम्मेलनात आपले विचार मांडले यावेळी त्यांनी साहित्य संम्मेलनाचे संयोजक डॉ.एकनाथ मुंडे यांचे विशेष अभिनंदन केले व ही परंपरा कायम पुढे चालु ठेवावी असे आवाहन केले. समारोप करतांना डॉ.एकनाथ मुंडे यांनी ग्रमिण साहित्य हे किती महत्वाचे बहिणाबाई चौधरी यांच्या साहित्यावरुन लक्षात येते असे सांगितले. तसेच डॉ.संतोष मुंडे यांनी या आमच्या विद्यालयातुन निश्चित उद्याचे साहित्य तयार होतील. याच कार्यक्रमात सौ.सुलेखा कराड यांनी आमचे आण्णा लेहिले हे पुस्तक तर डॉ.एकनाथ मुंडे लिखित इछापुर्तीश्वरनाथ जागृत महादेवा विषयीचे हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले. शेवटच्या सत्रात पापनाथेश्वर माध्यमिक विद्यालयाचे वार्षीक स्नेहंम्मलन पार पडले. या संम्मेलनाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष डॉ.एकनाथ मुंडे यांनी केले. या संम्मेलनाच्या माध्यमातुन विद्यार्थ्यांच्या कलाकुणांना वाव मिळतो असे ते म्हणाले. यावेळी ज्येष्ठ भागवत मुंडे, देवराव कदम, पैलवान मुरलधीर मुंडे, सुर्यकांत मुंडे, पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष अनंत गित्ते, प्रशांत जोशी, रानबा गायकवाड, धिरज जंगले, धनंजय आढाव, मोहन व्हावळे, धनंजय आरबुने, जगदिश शिंदे, महादेव गित्ते, प्रशांत कराड, मुक्ताराम कराड,  विनायक कराड, अशोक पाटील, प्रकाश मुंडे, मेघराज मुंडे, राजेभाऊ मुंडे, गणेश मुंडे, रामधन पारवे, पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
 श्रीनाथ मानव सेवा मंडळाच्या वतीने साहित्य भूषण, समाजभूषण, कलाभूषण, पत्रकार भूषण, शिक्षण भूषण, कुस्तीभूषण, अभियंता भूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यावेळी राज्यभरातील सुमारे चाळीस पुरस्कार विजेते उपस्थित होते. समारोप प्रसंगी पुरस्कार विजेत्यांचे मनोगत सादर करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नरेश काळे तर आभार मुख्याधिपिका सौ.सुलेखा कराड यांनी मानले. या कार्यक्रमास साहित्य रसिक, विद्यार्थी, पालक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment