तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 16 January 2020

तेरवी च्या कार्यक्रमा ऐवजी शाळेसाठी दिली देणगीदेऊळगाव येथील दुधाटे कुटुंबाचा सामाजिक उपक्रम

 ताडकळस,प्रतिनिधी शेख शहजाद
येथून जवळच असलेल्या देऊळगाव दुधाटे (ता. पूर्णा )येथील  शेतकऱ्याने आपल्या आजीच्या तेरवीसाठी परंपरागत कार्यक्रमासाठी होणारा खर्च टाळत गावातील जिल्हा परिषद शाळेत वृक्षारोपण करून शाळेसाठी अकरा हजार रुपयांची देणगी येथील प्रयोशिल शेतकरी तथा शेती सेवा ग्रुप चे सदस्य गोविंद दुधाटे व त्यांच्या कुटुंबीयांनी देऊन एक सामाजिक आदर्श निर्माण केला आहे.
 दि.२० डिसेंबर रोजी गोविंदराव दुधाटे यांच्या आजी पदमिन बाई  दुधाटे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले त्यानंतर तेरवीचा कार्यक्रम केला जातो परंतु गोविंदराव यांनी वडील मुंजाजी दुधाटे, कुटुंबातील सदस्य,तुकाराम दुधाटे,सखाराम दुधाटे,बळीराम दुधाटे यांच्याशी विचार विनिमय करून तेरवीच्या कार्यक्रमासाठी होणारा खर्च कमी करून गावातील जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेतला या सोबतच झाडे जिवंत राहण्यासाठी झाडांना ठिबक सिंचनां च्या माध्यमातून पाणी देत जगवण्याची जवाबदारी स्वतावर घेतली, झाडांना  संरक्षण जाळी बसविण्यात येणार आहे. 
गोविंदराव यांनी पुढाकार घेत झाडे लागवडी सह अकरा हजाराचा निधी दिल्याने गावातील इतर लोकांनीही शाळेला देणगी देणे चालू केले आहे. देऊळगाव येथील जि.प.शाळा आठवी पर्यंत आसून विद्यार्थी संख्या चांगली आहे .गावातील मुलांना चांगले दर्जेदार शिक्षण मिळावे व लोकांचा सहभाग वाढावा यासाठी गोविंदराव यांनी पुढाकार घेतला आहे.
 यावेळी  ह. भ.प. तुळशीदास महाराज नळदकर,शिवशेना जिल्हा प्रमुख विशालराव कदम ,पशुधन अधिकारी किरण मानवतकर,हवामान अभ्यासक पंजाबराव डख पाटील, उपशिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे,स्वच्छ भारत अभियान जिल्हा अध्यक्ष रमेशराव गोळेगावकर,मुख्यमंत्री ग्राम परीवर्तक गडचिरोली गजानन आंबोरे, उद्योजक साहेबराव सिरस्कर,शेती सेवा ग्रुपचे मार्गदर्शक आमृतराज कदम, प्रयोगशील शेतकरी प्रताप काळे, संभाजीराव भोसले, जी.प.सदस्य गजानन आंबोरे,मुख्यद्यापक झुरुळे,मधुकर जोगदंड, बालासाहेब हिंगे , पत्रकार व्यंकटराव पवारआदी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले .यशस्वितेसाठी सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग दुधाटे, अड.राजेभाऊ दुधाटे,पो.पा.शिवाजी दुधाटे,उपसरपंच पांडुरंग दुधाटे,माधव दुधाटे, सुदाम आबा यांनी परिश्रम घेतले. यावेळी गावकरी मंडळी व परीसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
जि.प.शाळेतील आदर्श शिक्षक बळीराम कदम हे गेले एक महिन्यापासून  शाळेची झालेली दुरवस्था दूर करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत शाळेला स्वंरक्षण भित नसल्यामुळे मुक्त जनावरांचा मोठा त्रास शाळेला होत असल्यामुळे त्यांनी अगदी कमी खर्चात शाळेचे भंगारात पडलेल्या लोखंडी समानापासून पत्र्याची पक्की  शाळेला स्वंरक्षण भिंत केली परंतु इतर भवतीक सुविधांसाठी निधी कमी पडत असल्याने त्यांनी गावकऱ्यांच्या मदतीने शाळेत सुधारणा करण्यासाठी चंग बांधला आहे.

No comments:

Post a comment