तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 20 January 2020

दत्ता विघावे यांची कृषीमंत्र्यांशी सदिच्छा भेट
सात्रळ /प्रतिनिधी
बाबासाहेब वाघचौरे  - वर्ल्ड कॉन्स्टीट्यूशन अँड पार्लमेंटचे ( डब्ल्यूसीपीए )श्रीरामपूर चॅप्टरचे ( महाराष्ट्र ) अध्यक्ष दत्ता विघावे यांनी  महाराष्ट्राचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री नामदार दादाजी भुसे यांची त्यांच्या मालेगाव येथील कार्यालयात सदिच्छा भेट घेतली, व ना. भुसे यांचा महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात समावेश होऊन कृषीमंत्रीपद मिळाल्याबद्दल सत्कार केला. याप्रसंगी डब्ल्यूसीपीएचे कोषाध्यक्ष प्रा. शैलेंद्र भणगे व दै. बालेकिल्लाचे संपादक निवृत्ती बागुल हे उपस्थित होते.  
     वर्ल्ड कॉन्स्टीट्यूशन अँड पार्लमेंट ( डब्ल्यूसीपीए ) या जागतिक संस्थेच्या कार्याविषयी उभयतांत चर्चा झाली असून वर्ल्ड कॉन्स्टीट्यूशन अँड पार्लमेंट ( डब्ल्यूसीपीए ) च्या श्रीरामपूर येथे फेब्रवारी महिन्यात होणाऱ्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे निमंत्रण श्री. दत्ता विघावे यांनी मंत्री महोदयांना दिले.

No comments:

Post a comment