तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 15 January 2020

संक्रांतीच्या सणाचे औचित्य साधून जि.प.अध्यक्षा शिवकन्या सिरसाट यांनी आज दुपारी अध्यक्ष पदाचा पदभार स्विकारला


(प्रतिनिधी) :- जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिवकन्या सिरसाट यांनी आज दुपारी पदभार घेतला. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बजरंगबप्पा सोनवणे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषदेचे गटनेते अजय मुंडे व यांच्या सह पदाधिकारी उपस्थित होते.  जिल्हा परिषदेतील सर्व विभागप्रमुख, कर्मचाऱ्यांनी नुतन अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
           बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडी दि.४ जानेवारी रोजी झाल्या होत्या. मात्र न्यायालयाच्या आदेशानुसार निकाल राखीव ठेवुन दि.१३ जानेवारी रोजी अध्यक्ष, उपाध्यक्ष यांची निवड जाहीर करण्यात आली. आज संक्रांतीच्या सणाचे औचित्य साधून जि.प.अध्यक्षा शिवकन्या सिरसाट यांनी आज दुपारी अध्यक्ष पदाचा पदभार घेतला. यावेळी फटाक्यांची
आतषबाजी करण्यात आली. नूतन अध्यक्षांना
शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या कॅबीनमध्ये अनेकांनी
गर्दी केली होती. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष
बजरंग बप्पा सोनवणे, जिल्हा परिषदेचे गटनेते अजय मुंडे यांच्यासह अन्य पदाधिकारी
उपस्थित होते.

विषय समित्यांच्या निवडी कडे लक्ष !

जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष यांनी आज पदभार स्वीकारल्यानंतरचा आता विषय समित्यांच्या निवडीकडे लक्ष लागले आहे. उद्या किंवा परवा विषय समिती पदाधिकार्यांच्या निवडी होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी-
काँग्रेस-शिवसेना या महाविकासआघाडीने एकत्र येवुन जिल्हा परिषदेत परिवर्तन घडविल्यानंतर आता विषय समित्यांवर कोणाला संधी मिळते ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. काँग्रेसचे सदस्य राजेसाहेब देशमुख यांना
पुन्हा एकदा शिक्षण समिती मिळण्याची शक्यता आहे तर युद्धाजित पंडित यांना बांधकाम समिती मिळु शकते.

No comments:

Post a Comment