तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 15 January 2020

अभिनव विद्यालयात मकर संक्रात व भूगोल दिन विविध कार्यक्रमाअंतर्गत संपन्नपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  ज्ञान प्रबोधिनी विकास शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अभिनव विद्यालय नेहरू चौक स्थळ परळी वैजनाथ येथे मकर संक्रात व भूगोल दिन संस्थेचे अध्यक्ष राजाभाऊ जब्दे व व संस्थेचे सचिव परळी भूषण साहेबराव फड यांच्या मार्गदर्शनाखाली साजरी करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे सचिव परळी भूषण साहेबराव फड उपस्थित होते तसेच या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून शाळेचे मुख्याध्यापक प्रताप मुंढे व सहशिक्षक सचिन सोमवंशी उपस्थित होते या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेच्या पूजनाने झाली या कार्यक्रमाचे प्रस्ताविक मकर संक्रात  बद्दल अश्विनी बेंबळे हिने तर भूगोल दिनाबद्दल सागर जगताप यांनी केले त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या भूगोल विषयाच्या भित्तीपत्रक स्पर्धाचे प्रदर्शनाचे उद्घाटन केले  या स्पर्धेचे परीक्षक म्हणून के एम देशमुख व कृष्णा गवळी यांनी काम पाहिले त्यानंतर प्रमुख अतिथी सचिन सोमवंशी यांनी मकर संक्राती बद्दल माहिती दिली मकरसंक्रांत हा भारतातील पौष महिन्यात येणारा एक शेती संबंधित सण आहे. सौर कालगणनेशी संबंधित असा हा महत्त्वाचा भारतीय सण आहे. भारतीय संस्कृती ही कृषी संस्कृती आहे. या दिवसांमध्ये शेतांत आणि मळ्यांमध्ये आलेल्या धान्याचे वाण एकमेकांना स्त्रिया देतात. हरभरे, ऊस, बोरे, गव्हाची ओंबी, तीळ अशा गोष्टी सुगडात भरून त्या देवाला अर्पण करतात. बायका उखाणे घेतात. हा सण जानेवारी महिन्यात व हिंदू पंचांगाप्रमाणे पौष महिन्यात येतो.मकरसंक्रांतीला महाराष्ट्रात नुसतेच संक्रांत म्हणतात.
दरवर्षी २१-२२ डिसेंबरला सूर्याची किरणे पृथ्वीच्या साडेतेवीस दक्षिण या अक्षांशावर लंबरूपात पडतात आणि त्या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते. इसवी सनाच्या सुरुवातीच्या वर्षांत सूर्य त्याच सुमारास मकर राशीमध्ये संक्रमण (प्रवेश) करीत असे, त्यामुळे साडेतेवीस दक्षिण या अक्षवृत्ताला मकरवृत्त म्हणू लागले. पुढच्या काळात सूर्याच्या उत्तरायणाची सुरुवात २१-२२ डिसेंबरलाच होत राहिली, तरी पृथ्वीच्या परांचन गतीमुळे सूर्याच्या मकरसंकमणाची तारीख पुढेपुढे जात राहिली. साहजिकच हिंदूंच्या मकरसंक्रांत या सणाची तारीख बदलत राहिली.मकरसंक्रांतीच्या दिवशी सूर्य धनू राशीतून मकर राशीत प्रवेश होतो. सूर्याचे उत्तरायण आधीच म्हणजे २१-२२ डिसेंबरलाच सुरू झालेले असते. अर्थातच त्या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरूच असते. पृथ्वीवरून पाहिले असता, २१-२२ डिसेंबरपासून सूर्याच्या उगविण्याची जागा दिवसेंदिवस उत्तरेकडे सरकते. अशी माहिती सचिन सोमवंशी यांनी दिली त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक प्रताप मुंढे यांनी भूगोल दिनाबद्दल माहिती दिली मकरसंक्रांतीला मुलांना शाळेत तिळगूळ वाटला जातो. ऋतुबदल होण्याचा हा दिवस भूगोलात महत्त्वाचा आहे. म्हणून याच दिवशी ‘भूगोल दिन’ साजरा करण्याचे ठरले. शालेय पातळीवर मात्र भूगोल विषयाची अक्षम्य उपेक्षा सुरू आहे...
गेली तीस वर्षे १४ जानेवारी हा भूगोल दिन म्हणून साजरा केला जातो. विषयानुरूप ‘दिन’ पाळण्याची एक परंपरा महाराष्ट्रात रुजू झाली आहे. मराठी दिन (२७ फेब्रुवारी), विज्ञान दिन (२८ फेब्रुवारी), तर संस्कृत दिन (आषाढस्य प्रथम दिवसे) इत्यादी. त्याप्रमाणे अत्यंत महत्त्वाचा पण दुर्लक्षित असा विषय म्हणजे भूगोल देशाच्या पातळीवरील भूगोल विषय-तज्ज्ञ प्रोफेसर चं. धुं. ऊर्फ सी. डी. देशपांडे यांचा अमृतमहोत्सवी सत्कार १९८६ मध्ये पुणे येथे पं. भीमसेन जोशी यांच्या झाला होता. पुण्यातील पत्रकार, लेखक डॉ. सुरेश गरसोळे यांनी तो घडवून आणला होता. तेव्हापासून मकरसंक्रांतीच्या दिवशी डॉ. देशपांडे यांचा जन्मदिन महाराष्ट्रभर ‘भूगोल दिन’ म्हणून विशेषतः शालेय पातळीवर सुरू आहे. मकरसंक्रांतीला मुलांना शाळेत तिळगूळ वाटला जातो. ऋतुबदल होण्याचा हा दिवस भूगोलात महत्त्वाचा आहे. म्हणून याच दिवशी ‘भूगोल दिन’ साजरा करण्याचे ठरले. त्यानुसार भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाचे उपक्रम निवडले जातात. व्याख्याने, ध्वनिफिती दाखवून भौगोलिक घटकांचे महत्त्व सांगणे, भौगोलिक सहली, नकाशे व इतर भौगोलिक साहित्याची प्रदर्शने, भौगोलिक विषयावर निबंध लिहिणे, इतर विषयांशी असलेला भूगोलाचा सहसंबंध असे अनेक उपक्रम घेतले जातात. अशी माहिती प्रताप मुंढे यांनी दिली त्यानंतर पर्यावरण वाचवण्यासाठी झाडे तोडू नका या विषयावर वर्ग आठवीतील विद्यार्थ्यांनी सुंदर प्रकारे पथनाट्य सादर केले यामधून पर्यावरण वाचवा असा संदेश दिला तसेच संस्थेच्या वतीने साहेब फड यांनी सर्व विद्यार्थ्यांना व  शिक्षकांना तिळगूळ देऊन संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. वैष्णवी तोरडमल हिने केले तर उपस्थितांचे आभार आर्यन पोरे यां

No comments:

Post a Comment