तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 15 January 2020

किसान सभेचा आज सिरसाळा येथे कर्जमुक्ती मेळावापरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
     अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने गुरुवार दि. 16 रोजी सिरसाळा येथे कर्जमुक्ती मेळावा आयोजित करण्यात आला आहे. किसान सभेचे राज्य सचिव काॅ. डाॅ. अजित नवले यांचे प्रमुख मार्गदर्शन होणार आहे. 
राज्य सरकारने दोन लाख रूपया पर्यंत चे शेतकऱ्यांचे कर्ज अटी शर्ती लाउन माफ करण्याचे जाहीर केले आहे. त्याऐवजी सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा. कर्जमाफी चा फायदा नियमीत कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही व्हावा. सस्टेनेबल अॅग्रो कमर्शियल फायनान्स लि. चे ठिबकसिंनसाठी घेतलेले कर्ज माफ करावे. नागरी सहकारी पतसंस्थांनी दिलेली कर्जे माफ करावी . 2018 चा मंजुर पीकविमा तात्काळ वाटप करावा.  2019 रब्बी चा पिकविमा स्वीकारावा किंवा नुकसान भरपाई द्यावी या शेतकर्यांच्या मागण्यांवर किसान सभा जनतेत जाउन जागृती निर्माण करीत आहे. शिवाय शेतकर्यांचा लढा उभा करणार आहे. त्याचाच भाग म्हणून अखिल भारतीय किसान सभा गुरूवार दि. 16 जानेवारी रोजी सिरसाळा येथील बाजार रोड पार्डीकर महाविद्यालय मैदानावर मेळावा आयोजित करण्यात आला आहे. मेळाव्यास मार्गदर्शक म्हणून किसान सभेचे राज्य सचिव काॅ डाॅ अजित नवले, राज्य उपाध्यक्ष काॅ उमेश देशमुख, काॅ अॅड अजय बुरांडे उपस्थित राहुण मार्गदर्शन करणार आहेत. या मेळाव्यास परळी तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येनी सहभागी व्हावे असे आवाहन किसान सभेचे जिल्हा सचिव काॅ मुरलीधर नागरगोजे, तालुका सचिव काॅ अनिरुद्ध गायकवाड, काॅ पप्पु देशमुख, बालासाहेब कडभाने, काॅ सुदाम शिंदे, विष्णु देशमुख, मदन वाघमारे, मनोज देशमुख यांनी केले आहे.

No comments:

Post a comment