तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 16 January 2020

वंचितासाठी तळमळीने काम करणारा कार्यकरता ही क्षमता ओळखत पवार साहेबांनी माझ्यावर दिलेल्या जबाबदारीसाठी मी त्यांचा ऋणी आहे-धनंजय मुंडे

माननीय शरदचंद्रजी पवार साहेब, माननीय सौ. सुप्रिया ताई सुळे यांच्या उपस्थितीत आज राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत दौंड येथे दिव्यांग व जेष्ठ नागरिकांना जीवनसहायक उपकरणे वाटप समारंभ संपन्न झाला. वंचितासाठी तळमळीने काम करणारा कार्यकर्ता ही क्षमता ओळखत पवार साहेबांनी माझ्यावर दिलेल्या जबाबदारीसाठी ना.धनंजय मुंडे त्यांचे ऋणी आहे.

परळीत भव्य सत्कार होऊनही मला भाषण करण्याची संधी मिळाली नाही. योगायोगाने राष्ट्रीय वयोश्री सोहळ्यात आदरणीय शरद पवार साहेब, या समाजातील प्रत्येक घटकासाठी जीवापाड प्रेम असलेल्या मा. सुप्रियाताई सुळे तसेच सर्व वडिलधाऱ्या मंडळींच्या उपस्थितीत मला प्रथम भाषण करण्याची संधी मिळाली. कर्णबधिरांसाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमानाने विशेष योजना आपण राबविणार आहोत. दिव्यांग महामंडळासाठी अधिक आर्थिक तरतूद करण्याची मान्यता आ. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केली आहे. तसेच तब्बल २५ वर्षानंतर पहिल्यांदाच पुण्यात दिव्यांगांसाठी स्पर्धा घेण्याची घोषणा यावेळी केली.

वयोमानानुसार अनेक व्याधी सुरू होतात. गरिबीमुळे उपकरणे घेऊ शकत नाही. त्यामुळे वृद्धपकाळ कोणाच्या तरी आधारावर काढावा लागतो. राज्यातील प्रत्येकाचा वृद्धापकाळ समृद्ध व्हावा यासाठी सामाजिक न्याय विभाग पुढाकार घेत विशेष तरतूद करणार. महाराष्ट्रातील सामाजिक न्याय विभाग देशात पहिल्या क्रमांकावर आणण्याचा माझा प्रयत्न राहिल.

No comments:

Post a comment