तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 20 January 2020

ज्ञानोबा आंधळे यांचा पाचव्या ग्रामिण मराठी साहित्य संमेलनात विशेष गौरवपरळी वैजनाथ  (प्रतिनिधी) :- श्रीनाथ मानव सेवा मंडळ नाथरा आयोजित पाचवे ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात उत्कृष्ठ चालक म्हणून कार्येरत असलेले हेळंब येथील ज्ञानोबा आंधळे यांना सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन विशेष गौरव करण्यात आला.
नाथ्रा येथे दि.17 व 18 जानेवारी 2020 रोजी  5 वे ग्रामिण मराठी साहित्य संम्मेलन व भव्य पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आले होते. या पुरस्कार वितरण प्रसंगी श्रीनाथ मानव सेवा मंडळाचे अध्यक्ष डॉ.एकनाथ घ. मुंडे , प्रसिध्द कथाकार प्रा.भास्कर बडे, डॉ.संतोष मुंडे, बीड येथील प्रसिध्द साहित्यीक अनंत कराड,   कुस्ती परिषदेचे तालुकाध्यक्ष मुरलीधर मुंडे, कन्हेरवाडी येथील विकास मुंडे,  मुख्याधिपिका सुलेखा कराड, अ‍ॅड.शुभांगी गित्ते, व्याख्याते चंद्रकांत हजारे, पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष अनंत गित्ते, प्रशांत जोशी, रानबा गायकवाड, धिरज जंगले, धनंजय आढाव, मोहन व्हावळे, धनंजय आरबुने, जगदिश शिंदे, महादेव गित्ते आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
       या संमेलनात कविता, गारुड, कथा वाचन, ग्रंथदिंडी व पुरस्कार वितरण आदि कार्यक्रम संपन्न झाले. या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून डॉ. एकनाथजी मुंडे यांनी उत्कृष्ट नियोजन नुसार कार्यक्रम मोठ्या उत्साह वातावरणात संपन्न झाले या साहित्य संमेलनात परळी तालुक्यातील मौजे हेळंब येथील परळी बसस्थानकातील चालक ज्ञानोबा आंधळे यांचा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे आंधळे यांचे चालक क्षेत्रातील योगदानाबद्दल  त्यांचा विशेष सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.  या उतुंग यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

No comments:

Post a Comment