तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 12 January 2020

राजमाता जिजाऊ यांना पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केले अभिवादन     बुलडाणा, दि. 12 : सिंदखेड राजा येथे राजे लखुजी जाधव राजवाड्यात आज जिजाऊ जयंती सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी राजवाड्यातील राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळी त्यांच्या शिल्प प्रतिमेला पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी माल्यार्पण करून अभिवादन केले. यावेळी त्यांचे कुटूंबीय उपस्थित होते. तसेच लोकप्रतिनिधी, अधिकारी यांची उपस्थिती होती.

राजमाता जिजाऊ यांना मान्यवरांकडून अभिवादन

·        खासदार सुप्रिया सुळे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचा समावेश

     बुलडाणा, दि. 12 : राजमाता जिजाऊ यांना त्यांच्या जयंतीदिनी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिवादन केले. त्यामध्ये बारामतीच्या खासदार श्रीमती सुप्रिया सुळे, राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचा समावेश आहे. मंत्रीमहोदयांनी माल्यार्पण करीत राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळी  त्यांच्या शिल्प प्रतिमेला अभिवादन केले. याप्रसंगी लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

    - - - - - - - - - - - - - -                                                                  
जिल्हाधिकारी कार्यालयात राजमाता जिजाऊ यांना अभिवादन

     बुलडाणा, दि. 12 : जिल्हाधिकारी कार्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांना त्यांच्या जयंतीनिमित्ताने अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करीत अभिवादन केले. याप्रसंगी प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी कैलास देवरे, उपजिल्हाधिकारी गौरी सावंत, भूषण अहीरे आदी उपस्थित होते.

जमील पठाण
8805381333

No comments:

Post a Comment