तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 16 January 2020

'टिश्यू पेपरवरच्या कविता'चे १८ रोजी प्रकाशन


(अनुज केसरकर)
मुंबई दि.
प्रसिद्ध पत्रकार, नाटककार तथा कवी राकेश शिर्के ऊर्फ सांध्य यांच्या 'टिश्यू पेपरवरच्या कविता ' या पहिल्यावहिल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन 18 जानेवारी रोजी प्रभादेवी येथील पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीमध्ये होत आहे.
सहित प्रकाशन या गोव्यातील अग्रगण्य बहुभाषिक प्रकाशन संस्थेच्या वतीने प्रकाशित होत असलेल्या या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून ज्येष्ठ नाटककार तथा नाट्यसंमेलनाध्यक्ष प्रेमानंद गज्वी असणार आहेत. १८ जानेवारी २०२० रोजी संध्याकाळी ५:३० वाजता अकादमीच्या चौथ्या मजल्यावरील नॅनो सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या सचिव मिनाक्षी पाटील, मुंबई आकाशवाणीचे माजी संचालक भूपेंद्र मेस्त्री, साहित्यिका मानसी चिटणीस, माजी विधानसभा सदस्य मंगेश सांगळे, वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. यावेळी प्रकाशानानंतर स्नेहा कुटे, दिवाकर मोहिते, अपर्णा जाधव, अशोक निकाळजे, संतोष खामगांवकर आदी कलाकार सदर पुस्तकातील निवडक कवितांचे अभिवाचन आणि सादरीकरण करतील. झी एंटरटेन्मेंटच्या कंटेंट एडीटर अश्विनी माने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार असून, साहित्य रसिकांनी सदर कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन सहित प्रकाशनच्यावतीने किशोर अर्जुन यांनी केले आहे.

No comments:

Post a comment