तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 14 January 2020

"आज के शिवाजी नरेंद्र मोदी" या पुस्तकावर तात्काळ बंदी घालून लेखकावर कठोर कारवाई करामोताळा तालुका शिवप्रेमी चे मुख्यमंत्र्यांना निवेदन..
 मोताळा:- भाजप चे नेते जय भगवान गोयल यांनी लिहिलेले पुस्तक "आज के शिवाजी नरेंद्र मोदी" या पुस्तकाचे भारतीय जनता पार्टीच्या दिल्ली येथील कार्यालयात प्रकाशन करण्यात आले..सदर पुस्तकात नरेंद्र मोदी यांची तुलना स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत केली आहे हे योग्य नाही. जगातील कोणत्याच व्यक्तीची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत होवू शकत नाही..छत्रपती शिवाजी महाराजांनी गावगाड्यातील शेतकऱ्यांना उभे करण्याचे काम केले..शेतकऱ्यांच्या मिरचीच्या देठाला सुध्या महाराजांनी हात  लावू दिला नाही.पण नरेंद्र मोदी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे सर्वात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहे..
   अशी तुलना करून असे लक्षात येते की भाजपच्या नेत्यांचे डोके ठिकाणांवर नाही .त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे अशी टीका संभाजी ब्रिगेड चे जिल्हा उपाध्यक्ष अमोल देशमुख यांनी केली तसेच यामुळे देशातील जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या आहे.त्यामुळे भाजप च्या नेत्यांनी तामाम देशातील जनतेची माफी मागितली पाहिजे तसेच या पुस्तकावर तात्काळ बॅन आणून लेखकावर गुन्हे दाखल करून कारवाई करा अशी मागणी यावेळी मोताळा तालुका शिवप्रेमी च्या वतीने तहसीलदार मार्फत मा मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली निवेदनावर सुनील कोल्हे, गणेश शिंदे, शे जमीर, निरृत्ती धोरण, बिस्मिल्ला कुरेशी, शे इस्माईल, शुभाश प्रधान, मिलिंद अहिरे, सैय्यद वसीम, श्रीकृष्ण बांगर, बळीराम नरवाडे, जितू खराटे, मो. साबीर सह तालुक्यातील शिवप्रेमी च्या स्वाक्षऱ्या आहेत.

No comments:

Post a Comment