तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 14 January 2020

लर्निंग माइंड संस्थेकडून महिलांच्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरणनगरसेवक श्री.गोपाळ आंधळे,श्रीमती गंगासागर शिंदे व श्री.व्यंकटेश शिंदे यांची प्रमुख उपस्थिती

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- जिजाऊ जन्मोत्सवा निमित्त महिलांसाठी घेण्यात आलेल्या  रांगोळी व मेहंदी स्पर्धांचे बक्षीस वितरण लर्निंग माइंड सेवाभावी संस्थेकडून करण्यात आले.या कार्यक्रमास प्रमुख अतिथी माजी शिक्षण सभापती तथा नगरसेवक श्री.गोपाळ आंधळे,नगरसेविका श्रीमती गंगासागर शिंदे तसेच शिवसेनेचे तालुका प्रमुख श्री.व्यंकटेश शिंदे उपस्थित होते. महिलांना देवी संबोधून घरात बसवण्यापेक्षा बरोबरीने पुढे घेऊन जाण्याची गरज असल्याचे प्रतिपादन गोपाळ आंधळे यांनी केले. याप्रसंगी बोलत असताना व्यंकटेश शिंदे म्हणाले की ज्या ज्या वेळी आयुष्यात आपलं सर्वस्व संपल्याची भावना निर्माण होते त्या त्या वेळी आपण राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांची  आठवण करता क्षणी शंभर हत्तीचं बळ माणसाच्या अंगात संचारल्या शिवाय राहत नाही.हे जगातील सर्वात मोठं सत्य आहे.

    लर्निंग माइंड सेवाभावी संस्थे कडून महिलांसाठी विविध उपक्रम राबवण्यात येऊन त्यांच्या कलेला योग्य व्यासपीठ मिळवून देण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष श्री.सेवकराम जाधव यांनी दिली. प्रशिक्षक राणी बद्दर यांच्या वतीने  गरजू  मुली व महिलांना मोफत बेसिक मेहंदी व शिवणकाम क्लास घेण्यात येणार असल्याची माहिती संस्थेकडून देण्यात आली. या स्पर्धेत अनेक महिलांनी सहभाग नोंदवला.यामध्ये मेहंदी स्पर्धेत प्रथम क्रमांक - गौरी साबू ,द्वितीय क्रमांक - कोमल शिंदे तर प्रोत्साहन पर सिया वानरे या बक्षीसाच्या मानकरी ठरल्या. रांगोळी स्पर्धेत प्रथम - गायत्री दहिवाळ,द्वितीय- प्रिया देवशटवार तर प्रोत्साहन पर -दुर्गेश्वरी सोनपेठकर यांनी बक्षीस पटकावले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.अनिल जाधव तर आभार संस्थेचे उपाध्यक्ष श्री.विश्वजित मुंडे यांनी व्यक्त केले. याप्रसंगी ब्लूम ब्युटी पार्लरच्या संचालिका संस्थेच्या सचिव सिमा गायकवाड,कोषाध्यक्ष श्री.सुरेश गायकवाड,सदस्य निर्मला जाधव,वृत्तनिवेदिका वैशाली रूईकर,कुसुमकर ताई यांच्या सह अनेक महिला उपस्थित होत्या.

No comments:

Post a comment