तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 19 January 2020

पल्स पोलिओ लसीकरण मोहीम आज तालुका व शहरात आयोजनपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- पल्स पोलिओ लसीकरण मोहीम दिनांक 19 जानेवारी रोजी संपूर्ण राज्यात राबविण्यात येणार आहे तरी आज पल्स पोलिओ मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे याचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ‌. रामेश्वर लटपटे वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय परळी वैजनाथ व डॉ. मोरे लक्ष्मण तालुका आरोग्य अधिकारी परळी वैजनाथ यांनी केले आहे.

   परळी तालुक्यातील शहर व ग्रामीण मिळून एकूण लोकसंख्या 30 34 51 इतकी असून ० ते ५ वर्ष वयाच्या एकूण लाभार्थी २३118 आहेत. एकूण लस 43000 अपेक्षित आहे एकूण 221 बुथद्वारे लसीकरण करण्यात येणार आहे तरी करिता 565 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लाभार्थी लसीकरणापासून वंचित राहू नये म्हणून लसीकरण लहान मुलांना पाल्यांनी सहभागी करावे तसेच ग्रामीण भागात 21ते 23 जानेवारी या तीन दिवसीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे गावागावातील घरोघरी जाऊन लसीकरण करण्यात येणार आहे तसेच शहरी भागात 21 ते 25 जानेवारी घरोघरी भेटीचे आयोजन करण्यात आले आहे ग्रामीण भागात व शहरी भागात एकूण 58 592 घरात पल्स पोलिओ मोहिमेसाठी कर्मचारी भेटी देण्यात येणार आहेत व पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे याकरिता तालुक्यासाठी 14 वा ने व पाच वाहने उपलब्ध करण्यात आले आहेत. तरी पालकांशी कर्मचाऱ्यांनी संपर्क साधावा या मोहिमेत आरोग्य कर्मचारी अंगणवाडी कार्यकर्ता आशा यांच्यामार्फत लाभार्थ्यांना 15 ते 17 जानेवारी दरम्यान पल्स पोलीस लसीकरण करणे बाबत सूचना देण्यात आले आहेत प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरील बुथवर कर्मचारी व प्रवेशक उपस्थित राहतील तरी या मोहिमेचा तालुक्यातील व शहरातील पालकांना आवाहन करण्यात आले आहे

No comments:

Post a Comment