तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 20 January 2020

सात्रळ महाविद्यालयात वाणिज्य क्षेत्रातील करीयरच्या संधीबाबत व्याख्यान संपन्न
      सात्रळ/प्रतिनिधी
बाबासाहेब वाघचौरे  - लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधिने सन्मानीत ) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सात्रळ, येथे वाणिज्य मंडळा अंतर्गत वाणिज्य शाखेतील विद्यार्थांना वाणिज्य क्षेत्रातील नोकरीच्या विविध संधी या विषयावर अहमदनगर आयलर्न सेंटरचे प्रा. अभिषेक गायके मुख्य प्रशिक्षक ,श्री.प्रकाश बेरड व कैवल्य देशमुख यांनी उद्योजकांचे आत्मचरित्र सांगितले .  

सदर व्याख्यानात त्यांनी बँकिंग क्षेत्रातील विविध संधी या UPSC व MPSC च्या तुलनेत अधिक प्रमाणात असून भारघोष पगार व भत्ते मिळतात असे सांगत बँकिंग क्षेत्राचे महत्व व संधी अधोरेखित केल्या.

याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती जयश्री सिनगर अध्यक्षस्थानी होत्या  , तसेच वाणिज्य विभागाचे प्रा घाणे डी.एन. यांनी प्रास्ताविक केले व प्रा. शिंदे व्ही.जी. यांनी आभार मानले. सदर प्रसंगी डॉ.ताजणे यु ए. ,प्रा. दिघे व्ही.के.,प्रा. दिवेकर एच एल. व वाणिज्य शाखेतील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी हे उपस्थित होते.

No comments:

Post a comment