तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 15 January 2020

समृद्धी वरील वीज चोरी महावितरण ने पकडली
,मात्र अवैध गौण खनिज बद्दल महसूल उदासीनच!


डोणगाव. १६
बेलगांव येथील विनोद बाजड या शेतकऱ्याने समृद्धी महामार्गावरील पुलाच्या कामाला चोरीची विद्युत वापरत असल्याने अस्ताव्यस्त टाकलेल्या केबलने जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण होण्याची तक्रार दिली होती. दि. 15 जानेवारी ला महावितरण कंपनीने पथक तयार करून दि. 15 जानेवारी लाच दुपारी
त्वरित दखल घेत केली कार्यवाही यात तीन कटर माशीनसह200फुट केबल केला जप्त.
विना परवाना अवैध उत्खनन बाबत महसूल प्रशासन मात्र गेल्या दोन महिन्या पासून गुपचूप आहे.

समृद्धी महामार्ग अवैध व विना परवाना गौण खनिज उत्खनन साठी चर्चेत आहे मात्र यावर अद्याप महसूल विभागाने कोणतीही कार्यवाही केली नाही या प्रकरणी कोणतीही कार्यवाही होत नसल्याने संबधित कंपनीने विना परवाना खोडकामाचा सपाटा लावलेला आहे तर दुसरीकडे समृद्धीवरील पुलाच्या कामाला सुद्धा चोरीची वीज वापरत असल्याचे शेतकऱ्याने तक्रार दिली होती यावर विद्युत वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी १५ जानेवारी रोजी कार्यवाही केली.
समृद्धी महामार्गाच्या कामाची सुरुवात मेहकर तालुक्यात झाली यात ग्राम बेलगाव येथील शेतकरी विनोद बाजाड यांनी एक तक्रार १३ जानेवारी रोजी विद्युत वितरण कंपनीच्या सहाय्यक अभियंत्यास देऊन निवेदनात सांगितले होते की समृद्धीच्या २६०,२६१,२६२ या चॅनेल नंबरवर सुरू असलेल्या पुलाच्या कामात अवैध विद्युत जोडणी केलेली असल्याने त्या साठी जे केबल टाकण्यात आले त्या केबालने शेतकरी,वन्य प्राणी व पाळीव प्राण्यांना जीविताचा धोका होऊ शकतो यावर विद्युत वितरण कंपनीने १५ जानेवारी रोजी धडक कार्यवाही करत सरळ पुलाच्या कामाच्या ठिकाणी जाऊन रंगेहाथ पकडले व त्या ठिकाणी असलेले केबल व कटर मशीन पकडली ही कार्यवाही उप विभागीय अभियंता प्रशांत उईके,लाईनमन संदीप गव्हांदे,बिरलेअण्णा ,विजय इंगळे,किशोर वाघमारे यांनी ही कार्यवाही भारतीय कायदा २००३ च्या कलम १३५ नुसार केली यात विद्युत वितरण विभाग सखोल चौकशी करून संबधित ठेकेदारावर दंडात्मक कार्यवाही करेल.अशी माहीती उपविभागीय अधिकारीप्रशांत उईके यांनी दिली
समृद्धी महामार्ग साठी अवैध खोदकाम करत असल्याने शेतीचे नुकसान होईल यावर कार्यवाही न झाल्यास इच्छा मरणाची परवानगी शेतकरी पुत्र मनोज नव्हाळे यांनी केल्या नंतर अत्ता परियांत ५ तक्रार अर्ज देऊन सुद्धा कोणतीही कार्यवाही झाली नाही त्यामुळे समृद्धी मध्ये पाणी मुरते कुठे हा प्रश्न निर्माण झाला इतकेच नव्हेतर सरळ शासकीय गायरान सुद्धा खोदून टाकण्यात आले यावर सुद्धा महसूल विभागाने कोणतीच कारवाही केली नाही अश्यातच एकाच तक्रारीत विद्युत वितरण कंपनीने कार्यवाही केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे अशीच तडका फडकी कार्यवाही महसूल विभागा कडून कधी होईल की महसूल विभाग समृद्धीच्या स्वाधीन झाले असा प्रश्न जनसामान्यांच्या मनात निर्माण झालेला आहे.
----------------------------
समुद्धी महामार्गावर विजेची खुलेआम चोरी होत असल्याची माहिती मिळताच घटना स्थळी पोहचल्यावर विज चोरी होत असल्याचे आढळून आले व  चोरी होत असलेल्या विजेचा पुरवठा खंडीत करुन संबंधीतावर गुन्हे दाखल करण्यात आले

संदीप गव्हाणे
 विद्युत तंत्रज्ञ  डोणगाव. जमील पठाण
8805381333

No comments:

Post a comment