तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 15 January 2020

संत चोखामेळा जन्मस्थान विकासआराखडा पूर्ण करणार - पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे


 संत चोखामेळा जन्मोत्सव यांचा752 वा उत्साहात साजरा


 बुलडाणा, दि.14 :
या महिन्यात राष्ट्रमाता जिजाऊ जयंती, संत चोखामेळा जन्मोत्सवसिंदखेड राजा विधानसभा मतदार संघात साजरे करण्यात येतात. त्यामुळे मतदारसंघात चैतन्यनिर्माण होते. संत चोखामेळा जन्मस्थळाचा विकास करण्यासाठी शासन कटीबद्ध आहे. येथीलविकासाकरीता 5 कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. त्यापैकी मागील काळात 50लक्ष रूपये मिळाले. उर्वरित निधी मिळवून हा विकास आराखडा पूर्ण करण्यात येईल, असेप्रतिपादन राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी आज केले.   मेहुणाराजा. ता. दे.राजा येथे संत चोखा मेळा यांचा 752 वा जन्मोत्सव सोहळा जिल्हा परिषदेच्यावतीनेआयोजित करण्यात आला होता. त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगीव्यासपीठावर माजी आमदार सर्वश्री डॉ. शशिकांत खेडेकर, हर्षवर्धन सपकाळ,  जि.प उपाध्यक्षा कमलताई बुधवत, जि.प सभापतीदिनकर देशमुख, दे.राजा पंस सभापती हरीष शेटे, जि.प सदस्य सर्वश्री मनोज कायंदे,रियाजखॉ पठाण, शिला शिंपणे, प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, उपविभागीयअधिकारी विवेक काळे, तहसिलदार सारीका भगत,  मंगळवेढा येथील अप्पासाहेबपुजारी,  शिवराज महाराज, रजनी शिंगणे, प्रा.कमलेश खिल्लारे, पं.स सदस्य रेणुका बुरकूल, माजी जि.प सदस्य बाबुराव नागरे, शिक्षणाधिकारीएजाज खान, सरपंच राधा भरत कांबळे आदींसह लोकप्रतिनिधी उपस्थित होते.   संतचोखामेळा हे संत परंपरेतील मोठे नाव असल्याचे सांगत पालकमंत्री म्हणाले, संतचोखामेळा यांचे मेहुणा राजा हे गांव सर्व जाती – धर्माचे आहे. येथे सर्व जाती –धर्मातील नागरिक गुण्या गोविंदाने नांदतात. येथील केवळ भौतिक विकासच नाही, तर पर्यटनीयदृष्ट्याविकास झाला पाहिजे. या आराखड्यातील सर्व कामे दर्जेदार होण्यासाठी आपला प्रयत्नराहणार आहे.  याप्रसंगी सभापती श्री. शेटे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाच्या आयोजनामागिलभूमिका त्यांनी स्पष्ट केली. कार्यक्रमादरम्यान प्रा. कमलेश खिल्लारे, मंगळवेढा येथीलश्री. पुजारी, दिपक खार्डे यांनी आपले विचार व्यक्त केले. माजी आमदार डॉ. शशिकांतखेडेकर यांनी मागील काळात याठिकाणी केलेली विकासकामे सांगितली. हर्षवर्धन सपकाळयांनी हा जन्मोत्सव सोहळा लोकोत्सव होण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.  कार्यक्रमाचे संचलन श्री. जाधव यांनी केले.कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमापूर्वीपालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी संत चोखामेळा यांचे पूजन करून दर्शन घेतले.त्यानंतर मेहुणा राजा गावातील संत चोखामेळा यांच्या दिंडीमध्ये सहभागी होत त्यांचेपालखीचे दर्शन घेतले.


जमील पठाण
8805381333

No comments:

Post a Comment