तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 19 January 2020

निष्ठेला तोड नाही, स्व.गोपीनाथराव मुंडेंचा तिरूपतीच्या चौकात फोटो


परळी वैजनाथ/अंबाजोगा -भाविक भक्तांमध्ये ज्याप्रमाणे आपआपल्या देव देविकांच्या निष्ठेला तोड नसते. तसंच काही राजकारणात असतं.कार्यकर्ता आपल्या लाडक्या नेतृत्वावर जीवापाड प्रेम करतो.स्व.गोपीनाथराव मुंडे यांना अवतारी पुरूष म्हणून ओळखले जायचे.त्यांच्यावर असलेल्या निष्ठा आजही शिदोरीसारख्या बांधुन ठेवल्या जातात.महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्यांच्या फोटोशिवाय बॅनर नाही.मात्र सातासमुद्राच्या पलीकडे त्यांचे नेतृत्वाची ख्याती जावुन पोहोचलेली होती.याची प्रचिती परवा आली.तीर्थक्षेत्र तिरूपती बालाजीच्या रेल्वेस्थानकाच्या समोर एका मोठ्या चौकात गोपीनाथराव मुंडे यांचा फोटो असलेले बॅनर असुन महाराष्ट्रातील भाविक जेव्हा तिथे उतरतात तेव्हा पाहुन ऱ्हदयी समाधानी होतात.
गोपीनाथराव मुंडेंनी उभ्या आयुष्यात राजकारणाच्या माध्यमातुन समाजकारण करताना माणसं जोडण्याचा फार मोठा प्रयोग त्यांनी हाती घेतला होता.देशाच्या कानाकोपऱ्यात त्यांच्या नेतृत्वाची प्रचिती होती.आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कुठेही गेले तरी त्यांचे बॅनर दिसतात. एवढेच नाही तर 12डिसेंबर रोजी जयंतीच्या दिवशी गोपीनाथ गडावर सांगली, साताऱ्याहुन भक्तांच्या दिंड्या आलेल्या होत्या. या नेतृत्वाने अठरापगड जातीधर्माच्या लोकांवर जीवापाड प्रेम केलं.तसं कार्यकर्त्यांनीही त्यांच्यावर अंतरंगाने प्रेम केलं.आज ते नाहीत तरीही लाखो जीवाभावाचे कार्यकर्ते त्यांच्या रूपाने ना.पंकजाताईच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहतात.नव्हे तर अनेकांना मंत्री महोदयाच्या चेहऱ्यात साहेबांचा चेहरा दिसतो.कंठश्च जीवश्च परस्पर नाते जोडणारा नेता होवुन गेला.त्यामुळे परराज्यातसुद्धा त्यांची किर्ती दिव्यातल्या ज्योतीप्रमाणे तेवत राहताना दिसत आहे. दिल्लीत ऍटोरिक्षा चालक आजही मुंंडेंचं नाव घेवुन ढसढसा रडतात.त्यावरूनच सामान्य लोकांच्या प्रती हा नेता किती दयावान होता हा अनुभव दिल्लीहुन आलेल्या एका राष्ट्रवादी नेत्याने परवा सांगितला.तीर्थक्षेत्र तिरूपती बालाजी आंध्रप्रदेशातलं ठिकाण आहे.अर्थात कोट्यावधी लोक तिथे ये-जा करतात.भक्तांच्या प्रेमाला उपमा नसते.माणुस कुठेही असो अथवा नसो.तो आदर्श डोळ्यासमोर ठेवण्याचा अनेकजण प्रयत्न करतात.तिरूपतीच्या रेल्वे स्थानकाच्या बाहेर एक हॉटेल आहे. विशेषत: आंध्रप्रदेश नागरिकांचच हॉटेल असुन त्या हॉटेलच्या बाहेर मुंडे साहेबांचा मोठा फोटो लावुन बॅनर लावलेलं आहे.काही कार्यकर्त्यांनी त्याचे फोटो व्हॉटस अपवर टाकले असुन ते व्हायरलही झाले आहेत.सांगायचं तात्पर्य हे आहे की, आपल्या नेतृत्वापोटी असलेली श्रद्धा कधी लपुन राहत नाही. मुंडे अधुनमधुन नेहमीच तिरूपती बालाजीला जायचे.उपमुख्यमंत्री असताना चार-पाच वेळा त्यांनी तिरूपतीत जावुन बालाजीचे दर्शनही घेतलेले होते.राष्ट्रीय उपाध्यक्ष असताना पक्ष जबाबदारी म्हणून आंध्रप्रदेशात त्यांच्या अनेकदा जाहिर सभाही झालेल्या आहेत. त्याचाच एक भाग चाहत्यांपैकी असावा.महाराष्ट्रात बॅनर दिसले तर आश्चर्य नाही.पण अशा लाडक्या नेतृत्वाचं बॅनर आणि मोठा फोटो जेव्हा आंध्राच्या तेही तीर्थक्षेत्र असलेल्या तिरूपतीच्या चौकात दिसतो तेव्हा या लाडक्या नेतृत्वाची किर्ती किती सातासमुद्रापलीकडे जावुन पोहोचली होती याचे हे उदाहरण आहे.श्रद्धा कडवी असते. ती कुणाची भाटगिरी नसते. कार्यकर्ता ऱ्हदयातुन  जेव्हा प्रेम करतो तेव्हा नेतृत्व हे त्याला जन्मदात्या आई-वडिलांप्रमाणेच असते.याचे हे उदाहरण आहे.परवा तिरूपतीच्या दर्शनाला जाताना चौकात ऱ्हदयस्थ साहेबांचा फोटो दिसला.लगेच मी गाडी थांबवली व सविस्तर चौकशी करून तिथे फोटोला नतमस्तक झालो.

3 comments:

  1. सदर हॉटेल हे लातूरकडील व्यक्तीचे असून लीज वर तिरुपती मधील एका व्यक्तीला भाड्याने चालवायला दिल आहे याविषयी मी स्वतः चोकशी केली आहे

    ReplyDelete
  2. साहेबांचा फोटो आहे ही आभिमानस्पद गोष्ट आहे

    ReplyDelete
  3. साहेब लोकनेता होते.

    ReplyDelete