तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 16 January 2020

विज कंपनीच्या कर्मचाऱ्यांना शाँकपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- वीज वितरण कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या तक्रारी वाढलेल्या असताना कामात दिरंगाई करणे व अन्य कारणावरून अंबाजोगाई उपविभागातील तीन कर्मचाऱ्यांना निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तर कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत. 
      वीज ग्राहकांकडील वाढलेली थकबाकी, ग्राहकांच्या वेगवेगळ्या तक्रारी त्याच बरोबर कार्यालयातील बैठकीला असलेली गैरहजेरी आदी कारणास्तव अंबाजोगाई उपविभागातील तीन कर्मचाऱ्यांना अधिक्षक अभियंता संजय सरग यांनी तडाकेफडकी निलंबित केले असून पंधरा ते वीस कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत. परळी तालुक्यातील शहरातील वीज बिल दुरूस्तीची कामे सुरू असल्यामुळे कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली नसली तरी वीजबिल थकलेल्या ठिकाणचे वीज कनेक्शन कट करा, अनाधिकृतपणे वीज वापरणाऱ्या वीज ग्राहकांना वीज कनेक्शन कट करण्यात आले नाही तर संबधित वायरमवर कारवाई करा असे आदेश काढल्यामुळे वीज वितरण कंपनीतील कर्मचाऱ्यांना अधिक्षक अभियंत्यांनी जणु शाँक देण्याची तयारी सुरू केली आहे. यामुळे महावितरणचे कर्मचारी मध्ये खळबळ उडाली आहे.

No comments:

Post a comment