तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 11 January 2020

संस्कार प्राथमिक शाळेत भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री तथा श्री संत भगवान बाबा यांची पुण्यतिथी साजरीपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
    संस्कार प्राथमिक शाळेत आज भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री तसेच श्री संत भगवान बाबा यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. या वेळी कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून पद्मावती शिक्षण संस्थेचे सचिव श्री दीपकजी तांदळे सर तर प्रमुख अतिथी म्हणून शाळेचे मुख्याध्यापक श्री आनकाडे सर यांची उपस्तीथी होती या कार्यक्रमाची सुरुवात भारताचे पहिले पंतप्रधान श्री लाल बहादूर शास्त्री व संत श्री भगवान बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. 
     या वेळी पद्मावती शिक्षण संस्थेचे सचिव श्री दीपकजी तांदळे सर म्हणाले की भगवानबाबांनी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात कीर्तनाच्या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक, नैतिक व सांस्कृतिक प्रबोधन केले. भक्तिमार्ग, कर्ममार्ग व ज्ञानमार्ग यांचा त्रिवेणी समन्वय त्यांनी साधला होता. तो त्यांच्या कीर्तनातही दिसून येई. कीर्तनकार म्हणून त्यांना  प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. आपल्या कीर्तनांतून ते जातिभेद, धर्मभेद, अज्ञान, अंधश्रद्धा, अनिष्ट रुढी-परंपरा यांच्यावर प्रहार करीत. त्याच बरोबर त्यांनी लाल बहादूर शास्त्री यांच्या कार्याचा सुद्धा आढावा घेतला त्यांच्या बद्दल सांगताना ते म्हणाले की लाल बहादूर शास्त्री हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसैनिक व भारतीय प्रजासत्ताकाचे दुसरे पंतप्रधान होते. ९ जून, इ.स. १९६४ रोजी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली. यांच्या कार्यकाळात इ.स. १९६५सालचे दुसरे भारत-पाकिस्तान युद्ध घडले. सोव्हियेत संघाच्या मध्यस्थीने पाकिस्तानबरोबर युद्धबंदीचा ताश्कंद करार करण्यासाठी ताश्कंद  (तत्कालीन सोव्हियेत संघात, वर्तमान उझबेकिस्तानात) येथे दौऱ्यावर असताना ११ जानेवारी, इ.स. १९६६ रोजी यांचा मृत्यू झाला.एवढे बोलून त्यांनी आपली जागा घेतली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री मारुती आनकाडे सर यांनी केले तर श्री जगताप सर यांनी आभार मानले आणि अध्यक्षीय समारोप केला. 
    या कार्यक्रमासाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर वर्ग उपस्तिथ होता.

No comments:

Post a comment