तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 19 January 2020

अंबाजोगाईच्या एआरटीओने लावला वाहनधारकांना करोडो रूपयाचा चुना2004 ते 2017 पर्यंत या एआरटीओ कार्यालयाचे ऑडीट होणे गरजेचे 
या प्रकरावर सध्याच्या एआरटीओचे कानावर हात


अंबाजोगाई (प्रतिनिधी) :- 
अंबाजोगाईतील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू झाल्यानंतर येणार्‍या अधिकारी व कर्मचार्‍यांनी या भागातील वाहन धारकांना करोडो रूपयांचा चुना लावला आहे. कार्यालय सुरू झाल्यापासुन ऑनलाईन दस्ताऐवज झाल्यापर्यंत या कार्यालयातील रेकॉर्डचे ऑडीट झाले तर करोडो रूपयांचा घोटाळा उघडकिस येण्याची शक्यता आहे. या संबंधी सध्याच्या एआरटीओला विचारणा केली असता त्यांनी आपले हात कानावर ठेवले.
माजी मंत्री स्व.विमलताई मुंदडा यांनी शासन दरबारी पाठपुरावा करत अंबाजोगाई विभागातर्गंत येणार्‍या  केज-धारूर-माजलगाव- परळी -वडवणी या पाच तालुक्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सन 2004 मध्ये मंजूर करून आणले. आणि याच वर्षी हे कार्यालय सुरू देखील झाले. यशवंतराव चव्हाण चौकातील एका किरायाच्या जागेत मोठ्या थाटात सुरू  करण्यात आले. कार्यालय सुरू झाल्यानंतर आलेल्या अधिकारी, कर्मचारी व एजंटांनी मोठा धुमाकूळ घालत वाहन धारकांना करोडो रूपयांना चुना लावला. वाहन नोंदणी पुस्तीकेवर रोडटॅक्स विमा व इतर शासनाचे कर आकारणीचे नोंद वाहन नोंदणी पुस्तिकेवर झाली. प्रत्यक्षात मात्र ही नोंद उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या दस्ताऐवजातच नाही. यामध्ये व्हीआयपी क्रमांक, वाहन नोंदणी विलंब शुल्क या प्रकारच्या बनावट  पावत्या तयार करून या कार्यालयाने शासनाला चुना लावत वाहन धारकाला देखील करोडो रूपयांना गंडा घातला आहे.
या गंड्यात ज्येष्ठ विधिज्ञ देखील चुकले नाहीत. न्यायालयात न्याय दान करणार्‍या वकीलांची या कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी व एजंटांनी त्यांच्याकडून हजारो रूपयांचा टॅक्स वसुल करून तो शासन दरबारी भरलाच नाही. या सर्व प्रकारातूनच जालना येथील प्रादेशिक परिवहन अधिकार्‍याचा अंबाजोगाईतील कार्यालयातील कारकुणाच्या मुलाने खुन केला. तो मुलगा आज जन्म ठेपेची शिक्षा भोगत असला तरी अशा प्रकारामध्ये अधिकारी देखील सहभागी झाल्याचे उघड झाले आहे. जालना येथील खुना नंतर अंबाजोगाईच्या कार्यालयातील दस्ताऐवजाची पहानी केली असता वरिष्ठांनी संबंधीतांवर गुन्हे दाखल केले. व 2004 ते 2015 पर्यंत या कार्यालयातील सर्व दस्ताऐवज न्यायालयाने कष्टडीत जप्त केले आहेत. या प्रकरणाचा निपटारा झाल्यानंतर अंबाजोगाईच्या एआरटीओला कार्यालयातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी वाहन धारकांना किती कोटी रूपयांना चुना लावला आहे. हे स्पष्ट होणार आहे. स्व.मुंदडा यांनी बीड येथे जाण्याचा 100 कि.मी. हेलपाटा वाचावा यासाठी त्यांनी अंबाजोगाईत कार्यालय मंजुर करून आणले परंतु या कार्यालयानेच वाहन धारकांना कोट्यावधींना लुटले आहे. ही बाब उघड झाली आहे. अंबाजोगाई सत्र न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ दिगांबर विठ्ठलराव गाडे यांनी फोर्ड कंपनीची चार चाकी कार खरेदी केली होती. या कारची नोंदणी 2007 मध्ये अंबाजोगाईच्या कार्यालयात झाली. त्यांना दिलेल्या वाहन नोंदणी पुस्तिकेत (आर.सी.बुक) वर सदरील वाहनाचा रोड टॅक्स 42 हजार 700 रूपयांचा भरला असल्याची नोंद आहे व त्यावर पावती देखील बनावट नंबर टाकून दिलेली आहे. यानंतर आधार माणुसकीचे अध्यक्ष अ‍ॅड.संताष पवार यांनी गाडे यांच्याकडून 2015 मध्ये हीच गाडी खरेदी केली. गाडे यांच्या नावावरील गाडी पवार यांच्या नावावर करताना रोड टॅक्सच भरलेली नोंद आपल्या दप्तरात आहे की नाही हे न पाहताच या कार्यालयातील अधिकार्‍यांनी ही गाडी पवार यांच्या नावाने हस्तांतरण केली. आता 2019 मध्ये पवार यांनी अ‍ॅड.नितीन जाधव यांना गाडी विक्री केली असता त्यांच्या नावावर करून देण्यासाठी ते एआरटीओला कार्यालयात गेले असता ही गाडी खरेदी केल्यापासुन आजपर्यंत या गाडीचा रोड टॅक्सच भरला नसल्याचे अधिकार्‍यांनी त्यांना सांगितले. आणि हा गंभीर प्रकार ऐकूण ते आवाकच झाले. त्यांच्या गाडीच्या नोंदणी रजिस्टरला एका बनावट दुचाकीचा चिसी नंबर टाकुन 2583 रूपये टॅक्स भरला असल्याची नोंद झाली आहे. 2007 ला 42 हजार 700 रूपये रोड टॅक्स होता तो टॅक्स कायार्यलयाला न पोहोंचल्यामुळे तेंव्हापासुन आजपर्यंत या कार्यालयाने 9 टक्के व्याजासह 1 लाख 10 हजार रूपये पवार यांच्या गाडीवर टॅक्स काढला आहे. या कार्यालयाने विधिज्ञांची फसवणूक केली असल्याचे  उघड झाले असले तरी 2004 पासुन आजपर्यंत जेवढ्या वाहनांची नोंद झाली आहे. त्या वाहन धारकांची करोडो रूपयांची फसवणूक या कार्यालयाने केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाने खळबळ उडाली आहे. सदर प्रकरणाची शासनाने चौकशी करून वाहन धारकांना न्याय मिळवून द्यावा. अशी मागणी वाहन धारकातून होत आहे.
बातमी छापल्याने काय होत असते
2004 ते 2017 पर्यंत कार्यालयातील वाहन नोंदणीच्या दस्ताऐवजातील

No comments:

Post a comment