तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 18 January 2020

अंजुम उल उलूम कन्या शाळेत विज्ञान व गणित प्रदर्शन आणि बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  दिनांक 18 जानेवारी 2020 रोजी अंजुम उल  कन्या शाळेत शाळा स्तरीय  गणित व विज्ञान प्रदर्शन घेण्यात आला.त्यात  इयत्ता तिसरी ते दहावी पर्यंत विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. मुलींनी  जवळपास 60 गणित व विज्ञान प्रकल्प प्रस्तूत केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंजुमन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शेख इलियास अहमद हे होते. शिक्षण सभापती जिल्हा परिषद बीड राजेसाहेब देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले,या वेळी गतवर्षी झालेल्या विज्ञान प्रदर्शनामध्ये पारितोषक पटकावलेल्या विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र, मेडल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. अंजुमन शिक्षण संस्थेचे सचिव सय्यद हनिफ सय्यद करिम उर्फ बहादुर यांनी छोट्या छोट्या वैज्ञानिकांना की विज्ञाना शिवाय आजच्या जगात आपण कोणत्याही गोष्टीची कल्पनाच करू शकत नाही.येणाऱ्या काळात तुमच्यापैकीच कोणी चंद्रयान-३  मिशन मध्ये असेल.  गटशिक्षणाधिकारी गिरी साहेब यांनी अंजुमन कन्या शाळेत दरवर्षी विज्ञान शास्त्र विज्ञान प्रदर्शन आयोजित करत असते त्याची प्रशंसा केली तर  जिल्हा परिषद शिक्षण सभापती श्री राजेश देशमुख यांनी शिक्षण संस्थेस येणाऱ्या अडचणी दूर केल्या जातील असे आश्वासन दिले व प्रदर्शनांमध्ये मुलांशी संवाद ही केला व मुलांना 500 रुपये रोख बक्षीस दिले. यावेळी  संजय फड शिक्षण सभापती नगर परिषद परळी, परळी शहर काँग्रेस अध्यक्ष बाबुभाई नंबरदार ,संस्थेचे  उपाध्यक्ष हाजी शेख खाजा महेताब, सय्यद हुसेन, शेख जहीर अहेमद, जहीर अहेमद, सुलतान कुरेशी, एजाज सौदागर, शेख इनायत अली, सुलतान सर रोमान सर ,अब्दूल कदीर मौलाना व इतर उपस्थित होते. विज्ञान प्रदर्शन पाहण्यासाठी मुलींच्या पालकांनी शाळेत भेट विद्यार्थ्यांची प्रशंसा केली.विज्ञान प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी प्राथमिक शाळेच्या प्राथमिक मुख्याध्यापिका, माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका , शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment