तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 17 January 2020

रोहित्र जळाल्याने लिंबुटा, पांगरीतील शेतकरी संकटात पंधरा दिवसापासुन शेतकर्यांना छळणार्या महावितरणला धडा शिकवु- फुलचंद कराड


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- परळीपासुन जवळच असलेल्या लिंबुटा व पांगरी येथील रोहित्र मागील पंधरा दिवसापासुन नादुरुस्त झाल्याने शेतकर्यांची पिके वाळत असुन दोन्ही गावातील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे.हे रोहित्र दुरुस्त करण्यासाठी महावितरण परळी उपविभागाकडुन टाळाटाळ होत असल्याने शेतकरी व ग्रामस्थांना छळणार्या महावितरणच्या अधिकार्यांना जाब विचारुन धडा शिकवण्यात येईल असा इशारा भगवान सेनेचे सरसेनापती फुलचंद कराड यांनी दिला आहे.
 परळी-सिरसाळा मार्गावर असलेल्या लिंबुटा व पांगरी येथील गावठाणासह शिवारातील रोहित्र मागील पंधरा दिवसापासुन नादुरुस्त झाले आहेत.सध्या हिवाळ्याचे दिवस असुन रब्बी हंगामातील ज्वारी,हरभरा, तुर, भुईमूग अशा पिकांना पाणी देण्यासाठी शेतकर्याचे प्रयत्न सुरु आहेत. नेमके याच काळात रोहित्र नादुरुस्त झाले असुन हे रोहित्र दुरुस्त करावेत याबाबत शेतकर्यांनी वारंवार सुचना करुनही महावितरणच्या अधिकार्याकडुन कुठलीच दखल घेतली जात नाही.उलट संकटात सापडलेल्या शेतकर्यांकडुन सक्तीची वीजबील वसुली करण्यात येत असल्याने लिंबुटा व पांगरी परिसरातील शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत.या संकटात सापडलेल्या शेतकर्यांच्या व्यथांना केराची टोपली दाखवणार्या महावितरणच्या परळी उपविभागातील अधिकार्यांना रोहित्र दुरुस्तीसाठी वेळ का लागतोय,खरीपांची पिके वाया गेल्यानंतर उपजिवीकेसाठी रब्बी हंगामातील पिके घेणार्या शेतकर्यांकडुन करण्यात येणार्या पठाणी वसुलीबाबत जाब विचारुन नादुरुस्त झालेले रोहित्र तात्काळ दुरुस्त केले नाही तर महावितरण परळी उपविभागा विरोधात शेतकर्यांना सोबत घेवुन व्यापक आंदोलन करण्यात येईल असा इशारा भगवान सेनेचे सरसेनापती फुलचंद कराड यांनी दिला आहे.

No comments:

Post a Comment